शंकर जाधव, डोंबिवली
कडक उन्हाच्या घामाच्या धारांनी हैराण झाल्याने पावसामुळे गारवाने नागरिक सुखावले. गुरुवार 13 तारखेला दुपारी मुसळधार पाऊस पडल्याने काहींनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. शाळा सुरु असल्याने बच्चेकंपनीला पावसात भिजता आले नसले तरी महाविद्यालयीन तरुणांना मात्र पावसात भिजण्याचा मोह आवरता आला नाही. स्टेशनबाहेरील (Dombivli Station) परिसरात दरवर्षीप्रमाणे पाणी साचल्याने नागरिकांनां पाण्यातून चालत स्टेशन गाठावे लागले.
पाऊस पडल्याने हवेत गारवा पसल्याने वरून राजाचे आभार मानले. सकाळी 11 वाजेपर्यत पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत नसल्याने काहीही छत्री न घेताचा घराबाहेर पडले. पाऊस आज नक्की हजेरी लावणार याची कल्पना आल्याने ज्येष्ठ नागरिक व काही महिलांनी छत्री घेऊनच घराबाहेर पडणे पसंत केले. सकाळच्या सत्रात काही शाळा असल्याने लहान मुले मात्र वर्गाच्या खिडकीतून पावस पाहत होते. तर दुपारच्या सत्रातील शाळेतील विद्यार्थी शाळा सुटल्यावर पावसात भिजले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डोंबिवली स्टेशनबाहेरील परिसरात पाणी साचले होते. नागरिकांनां पाण्यातून चालत स्टेशन गाठावे लागले तर स्टेशन बाहेरील दुकानदारांनी काही तास दुकाने बंद ठेवली होती. स्टेशन समोरील काही दुकानात पावसाचे पाणी साचल्याने दुकानातील सामान उचलून वर ठेवण्यासाठी दुकानदारांची गडबड सुरु होती.