10.4 C
New York

Hamare Baraah Controversy : ‘हमारे बारह’च्या प्रदर्शनाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

Published:

सर्वोच्च न्यायालयाने अन्नू कपूर मुख्य भूमिकेत असलेले ‘हमारे बारह’च्या प्रदर्शनाला |(Hamare Baraah Controversy) स्थगिती दिली आहे. हा चित्रपट ७ जून २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता. परंतु चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या चित्रपटामध्ये लोकसंख्या वाढीच्या विषयी ठळक वर्णन केलं असल्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातून एका विशिष्ट समाजाला दोष देण्यात आलेला आहे. जातीय तेढ टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी (13 जून) चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांबाबत सुनावणी करत नाही आणि निकाल देत नाही, सुप्रीम कोर्टाने तोपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. “उच्च न्यायालयासमोरील याचिका निकाली निघेपर्यंत, चित्रपट प्रदर्शित करणे चुकीचे असेल,” असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.गेल्या आठवड्यात, मुंबई उच्च न्यायालयाने अन्नू कपूर स्टारर चित्रपटाचा रिव्ह्यू करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. यामध्ये एक मुस्लिम समाजातीलही व्यक्ती होता. न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनावरील स्थगिती उठवली होती आणि निर्मात्यांना सोशल मीडियावरून ट्रेलर काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.

लग्नानंतर पहिल्यांदाच कोकणातल्या घरी पोहोचली ‘कलरफुल’!

चित्रपटाचे प्रदर्शन १४ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, जोपर्यंत चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांबाबत मुंबई उच्च न्यायालय सुनावणी करत नाही आणि निकाल देत नाही, तोपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. चित्रपटाबद्दल सांगायचे तर, चित्रपटाचे दिग्दर्शन कमल चंद्रा यांनी केले आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आश्विनी कळसेकर, मनोज जोशी, पारितोष त्रिपाठी, अन्नू कपूर, पार्थ समथान, राहूल बग्गा सह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img