7.3 C
New York

Border 2: तब्बल २७ वर्षांनी मेजर कुलदीप येतोय तुमच्या भेटीला; ‘बॉर्डर २’ची घोषणा

Published:

Border 2: बॉलीवूडचा अभिनेता सनी देओलने आगामी चित्रपट ‘बॉर्डर २’ (Border 2) ची नुकतीच घोषणा केली आहे. ‘गदर २’ (Gadar 2) रिलीज झाल्यानंतर त्याच्या ‘बॉर्डर २’ या चित्रपटाची चर्चा रंगली होती. तेव्हापासूनच सनी देओलचा ‘बॉर्डर २’ हा चित्रपट चर्चेत होता. अखेर आता ‘बॉर्डर २’ या चित्रपटाची करण्यात आली आहे. अशातच आता सनी देओल ‘लाहौर १९४७’च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. ‘लाहौर १९४७’ या चित्रपटाचा निर्माता आमिर खान आहे तर राजकुमार संतोषी हे चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या दोन्हीही चित्रपटांमध्ये भारत आणि पाकिस्तानचा तणावपूर्ण संबंध पाहायला मिळणार आहे. ‘बॉर्डर २’ची जशी घोषणा झाली आहे त्यानंतर चाहत्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाची घोषणा करताच चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

 ‘हमारे बारह’च्या प्रदर्शनाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

Border 2: १९९७साली रिलीज झालेला सनी देओलच्या बॉर्डरचा सीक्वल ‘बॉर्डर २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची इंस्टाग्रामवर नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. सनी देओल परत एकदा या चित्रपटाच्या सीक्वलमधून कम बॅक करतो आहे. तब्बल २७ वर्षानंतर या चित्रपटाचा सीक्वल पुन्हा एखादा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

सनी देओलने इंस्टाग्रामवर बॉर्डर २ ची घोषणा करत व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सनीचा आवाज ऐकू येत असून तो बोलत आहे की, २७ वर्षांपूर्वी एका फौजीने वचन दिलं होतं. आणि तेच वचन पूर्ण करण्यासाठी आणि हिंदुस्तानाच्या मातीला सलाम करण्यासाठी येतो आहे. भारतामधली सगळ्यात मोठी वॉर फिल्म तुमच्या भेटीला येणार आहे. या आवाजावर चाहते आधीपासूनच फिदा आहेत तर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. बॉर्डर २ या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग सिंग करणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता करणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img