23.1 C
New York

Sunetra Pawar : अखेर सुनेत्रा पवार खासदार! राज्यसभेवर बिनविरोध निवड

Published:

बारामती

बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Election) सुप्रिया सुळेंकडून (Supriya Sule) पराभव झाल्यावर आता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) संसदेत बॅकडोअर एन्ट्री घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब झालंय. विधानभवनात जाऊन सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज आलेला नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. पक्षाने मला आज अधिकृत उमेदवारी दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) व सर्व पक्षातील नेत्यांचेआभार मानते, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिल्याने अजित पवार, कार्याध्यक्ष,कार्यकर्ते यांचे आभार मानते. दिलेल्या संधीचे सोनं करेल. लोकसभेच्या उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आली होती.  या उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आली आहे. माझ्यावर जो विश्वास पक्षाने दाखवला आहे. त्यांचे मी आभार मानते.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, 18 तारखेआधी माझ्या बिनविरोध विजयाबाबतचे कोणतेही विधान करणार नाही, असे सांगितल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आदिती यांच्या सांगण्यानंतर लगेचच सुनेत्रा पवारांनी याबाबतचे उत्तर दिले.

लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वतीने महायुतीच्या उमेदवार होत्या. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक होती. अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष या निवडणुकी मधून दिसून आला मात्र अखेर सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना पराभूत केले. त्यानंतर आता राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात यावी अशी बारामतीतील अनेक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. त्यानंतर अखेर आता सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या सोबतच छगन भुजबळ यांचे देखील या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी नाव चर्चेत होते.

सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभेचे उमेदवारी अर्ज आज दाखल केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img