लोकसभेमध्ये मुंबईचा गड राखणे महायुती ( Mahayuti ) आणि महाविकास आघाडीसाठी ( MVA) महत्त्वाचं होतं. त्यामध्ये पश्चिम मुंबईत मात्र ठाकरेंचा तिसरा विजय हातून निसटला आहे. कारण ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर ( Amol Kirtikar ) 2 हजार मतांनी विजयी झाले होते. मात्र येथे कमी मतांची आघाडी असल्याने वायकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. ज्यामध्ये वायकर यांनी केवळ 48 मतांनी शिंदेंचा गड राखला आहे. त्यावर आता किर्तिकरांनी न्यायालयात दाद मागणार आहेत. तसेच ठाकरे गट आणि संजय राऊतांनी ( Sanjay Raut ) या प्रकरणी एकनाथ शिंदे ( CM Shinde ) आणि निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यवंशी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत हे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
ठाकरे गटाची रूपाली ठोंबरेंना खुली ऑफर
राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि त्यांची गुलामी करणाऱ्या अधिकारी वंदना सूर्यवंशी यांना हा निकाल पचणार नाही. ही चोरी पचणार नाही. त्यांना जुलाब होणार. वंदना सूर्यवंशी यांचा प्रशासकीय इतिहास वादग्रस्त आहेत. अशा व्यक्तीला खास तिथे बसविण्यात आलं. सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही. त्यामुळे याला वंदना सूर्यवंशी जबाबदार आहेत.
रवींद्र वायकर यांचा मित्रपरिवार मोबाईल घेऊन फिरत होता. त्यांना रोखला का नाही? आपण प्रमुख होतात निर्णय आपण जरी केला पोलीस कुठलीही टोलवाटोलवी वंदना सूर्यवंशी करत आहेत. या सर्वांना जाब द्यावा लागेल. वंदना सूर्यवंशी यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला आहे. त्या आपल्या कर्तुत्वाला जागल्या नाहीत. त्यांनी आपला इतिहास पुढे दिला आहे. आम्ही कोर्टात जाणार अमोल कीर्तिकर विजयी होते अशी आमची खात्री आहे. असं म्हणत राऊतांनी शिंदेंसह निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वंदना सुर्यवंशी यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.