3.6 C
New York

Raj Thackeray : ‘तो’ पर्यंत राज ठाकरे मनसेच्या अध्यक्षपदी

Published:

मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्षपदी (MNS President) पुन्हा राज ठाकरे (Raj Thackeray) यांची एक मताने निवड करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या नियमानुसार पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये राज ठाकरे यांची पुढील चार वर्षाकरिता मनसेच्या (MNS) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा मनसेची धुरा राज ठाकरे यांच्याच हातात राहणार आहे.

मनसे पक्षाच्या अध्यक्षपदी राज ठाकरेंची निवड करण्यात आली आहे. मनसेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पडली असून त्यामध्ये एकमताने राज ठाकरेंची निवड झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमानुसार राज ठाकरेंची निवड झालीये. राज ठाकरे मनसे पक्षाचे 2023 पासून 2028 पर्यंत अध्यक्ष असणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत माहिती दिली. राज ठाकरे यांची नेमणूक करावी असा ठराव बाळा नांदगावकर यांनी मांडला. तर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी अनुमोदन दिले. या ठरावामध्ये एकमताने राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांनुसार राज ठाकरे यांची निवड झाली आहे.

कसभा निवडणूकन लढवता नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण हा पाठिंबा देताना त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. नुकत्याच लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी मी कोणाकडे जागा मागायला जाणार नाही. आपण विधानसभेच्या 200 ते 225 जागांवर लढण्याची तयारी करतोय, अशी घोषणा केली. राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर मनसे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मराठी माणसाने मतदान केलेलं नाही. कारण लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल राग आहे. मोदींविरोधातील मतदान उद्धव ठाकरेंना झालेलं आहे. जनता मनसेची वाट पाहत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे अद्याप जागावाटप ठरलेले नाही. परंतु मी कोणाकडेही जागा मागायला जाणार नाही. आपण विधानसभेला 200 ते 250 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी करत आहोत, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली. त्यांच्या या घोषणेनंतर मनसे पक्ष स्वबळावर विधानसभा निवणुकीला सामोरे जाणार असेच दिसत आहे. पण लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या शेवटपर्यंत स्वबळावर लढणार की, महायुतीचा घटक पक्ष म्हणून निवडणूक लढणार हे पाहावे लागेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img