3.2 C
New York

T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपवर पावसाचं सावट

Published:

टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर 8 मध्ये टीम इंडियाने प्रवेश केला आहे. गेल्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेचा 7 गडी राखून पराभव केला होता. टीम इंडियाने सुपर 8 मध्ये आपले स्थान या विजयासह पक्के केले आहे. भारताचा पुढील सामना कॅनडाविरुद्ध आहे. हा सामना फ्लोरिडातील लॉडरहिल येथे खेळवला जाणार आहे. फ्लोरिडाच्या मियामीमध्ये एक भयानक वादळ आले आहे. भरपूर पावसानंतर येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक देखील बंद झाली आहे. सोशल मीडियावर यासंबंधीचे अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. मियामी आणि लॉडरहिलमधील अंतर सुमारे 47 किलोमीटर आहे. त्यामुळे लॉडरहिल परिसरालाही फटका बसला आहे.

T20 World Cup  पावसामुळे सामना रद्द होऊ शकतो –

शनिवारी म्हणजेच 15 जूनला भारत आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यासोबतच पुराची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी मुसळधार पाऊस पडू शकतो. यानंतर परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा शनिवार आणि रविवारीही नाही. त्यामुळे भारत-कॅनडा सामन्यावर संकटाचे ढग आहेत. टीम इंडियाने सुपर-8 मध्ये स्थान मिळवले आहे. हा सामना रद्द झाल्यास त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

अमेरिकेचा पराभव करत टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धडक

T20 World Cup  तीन सामन्यांवर पावसाचं सावट-

अमेरिकेत सुरु असलेल्या पावसामुळे विश्वचषकाची समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. पावसामुळे भारत विरुद्ध कॅनडा, अमेरिका विरुद्ध आयर्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध आयर्लंडच्या सामन्यावर सावट असणार आहे. तीनही सामने न झाल्यास अमेरिका सुपर-8 मध्ये जाणार असं समीकरणानूसार दिसून येतंय.

T20 World Cup  सुपर 8 मध्ये भारताचा सामना कोणाशी होणार?

टीम इंडियाला सुपर-8 मध्ये तीन सामने खेळायचे आहेत. त्याचा पहिला सामना 20 जूनला आहे. दुसरा सामना 22 जून रोजी होणार आहे. हा सामना अँटिग्वा येथे होणार आहे. टीम इंडियाचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना 24 जून रोजी सेंट लुसिया येथे होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img