19.7 C
New York

Pooja Sawant: लग्नानंतर पहिल्यांदाच कोकणातल्या घरी पोहोचली ‘कलरफुल’!

Published:

Pooja Sawant: मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) नेहमीच चर्चेत असते. ‘दगडी चाळ’ (Dagadi Chawl) या चित्रपटातून लोकप्रिय झालेली ‘कलरफुल’ म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. पूजा सावंतने आजवर अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केल आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर अनेक पोस्ट व व्हिडिओ शेअर करत असते. पूजा सावंतने २८ फेब्रुवारी ला लग्नगाठ बांधली.

Pooja Sawant: पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचं लग्न मॅरेज पद्धतीत जमलेलं आहे. पूजाने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या नवऱ्याबरोबर सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर अभिनेत्रींच्या सर्वत्र लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. मग या फेब्रुवारी महिन्याच्या २८ तारखेला पूजाने साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळद आणि ग्रहमख या सर्व विधी करत सिद्धेश चव्हाणशी लग्न केलं.

पूजाचा नवरा सिद्धेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियात (Austrelia) असतो. त्यामुळे लग्न झाल्यांनतर १ ते दीड महिने पूजासुद्धा ऑस्ट्रेलियात राहिली होती. आणि ऑस्ट्रेलियातच दोघांनी मिळून होळी, गुडीपाडवा हे २ सण साजरे केले होते. सध्या पूजा मुंबईला एकटीच परतली आहे. आणि आता ‘कलरफुल’ तिच्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळतंय.

गोळीबार प्रकरणात सलमान खानचा जबाब नोंदवला

ओट्रेलियावरून परतताच पूजा सावंत लग्नानंतर पहिल्यांदाच कोकणातल्या घरी पोहिचली आहे. यावेळी तिच्यासोबत बहीण रुचिरा, भाऊ श्रेयस आणि तिचे वडील सुद्धा कोकणात फिरायला गेले आहेत. पूजाने कोकणातील निसर्गरम्य वातावरणाचे सुंदर फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केले आहेत. पूजाने शेअर केलेल्या सगळ्या फोटोंमध्ये कोकणातलं घर, आजूबाजूचा परिसर, आणि हिरव्यागार आमराईची सुंदर अशी झलक पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पूजा आणि सिद्धेश यांचं लग्न हे अरेंज आणि पूजाच्या पसंतीचं होत. अभिनेत्रीचा नवरा कामासाठी ऑस्ट्रेलियाला असतो. पूजाने तिच्या आणि सिद्धेशच्या नात्याबद्दल सर्वात पाहिलं गश्मीर महाजनीची बायको गौरीला सांगितलं होतं. त्यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबर ( २०२३ ) महिन्यात जोडीदाराबरोबर फोटो शेअर करत पूजाने सर्वांनाच खुशीचा धक्का दिला होता. लग्न झाल्यानंतर पूजा भारतात तर, सिद्धेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियात आहे.

पूजा सावंतच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री शेवटची ‘मुसाफिरा’ चित्रपटात झळकली. यामध्ये तिच्याबरोबर पुष्कर जोग, दिशा परदेशी व पुष्कराज यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img