19.7 C
New York

Hasan Ali : पाकिस्तानी गोलंदाजाने शेअर केली वैष्णोदेवी हल्ल्याची पोस्ट

Published:

T-२० विश्वचषकाचा थरार सुरु आहे. या विश्वचषकात ९ जून रोजी भारताचा पाकिस्तानशी सामना झाला आहे. या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पाकिस्तानला ६ धावांनी पराभूत केले. खरोखरच हृदय पिळवटून टाकणारा भारतामध्ये रियासी येथील दहशतवादी हल्ला होता. तर न्यूयॉर्कमध्ये भारताचा संघ जिंकला याचा जल्लोष सुरु होता. या दहशतवादी हल्ल्याचा केवळ भारतातच नाही तर परदेशातही तीव्र निषेध केला जात आहे. या हल्ल्यामध्ये किती भारतीयांनी त्यांचा जीव गमावला. या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीनेही (Pakistan Bowler Hassan Ali) प्रतिक्रिया दिली आहे.

दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केल्यानंतर एक गोळी चालकाला लागली, ज्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले अन् गाडी थेट दरीत कोसळली. पण, गाडी दरीत कोसळल्यामुळे अनेकांचा जीव वाचला. बस दरीत कोसळली नसली तर इतर सर्व लोकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या असत्या, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. या घटनेवर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला होता, तर ४१ जण जखमी झाले होते. शिव खोरी मंदिरातून कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हा हल्ला झाला. हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्याचे चित्र जम्मू-काश्मीर पोलिसांनी शेअर केले असून त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला २० लाखांचे बक्षीस देण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले आहे.

जम्मूतील हल्ल्यांचा बदला घेण्यास भारत सज्ज

स्टोरीमध्ये रियासी येथील हल्ल्याच्या निषेधार्थ हसन अलीने (Hasan Ali) इन्स्टाग्राम पोस्टर शेअर केले. “ऑल आईज ऑन वैष्णोदेवी” असे यामध्ये त्याने लिहिले आहे. रफाहवरील इस्रायली हल्ल्याबद्दल विरोध व संताप व्यक्त करताना सोशल मीडियावर ‘ऑल आइज ऑन Rafah’ या पोस्ट ट्रेंड झाल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी विविध मुद्द्यांवर विरोध दर्शवण्यासाठी ‘ऑल आयज ऑन…’ च्या अनेक आवृत्त्या ट्रेंड केल्या. मागील पाच दिवसात भारतात सुद्धा सामान्य नागरिकांकडून “ऑल आईज ऑन वैष्णोदेवी” या पोस्ट शेअर केल्या जात आहेत पण ज्या सेलिब्रिटीजनी पुढाकार घेऊन रफाहावरील हल्ल्याचा विरोध केला होता त्यांनी अद्याप रियासी हल्ल्यावर भाष्य केलेले नाही. यावरून सुद्धा ऑनलाईन चर्चा आहेत. या मुद्द्यावर पाकिस्तानी खेळाडूने पोस्ट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. हसन अली पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघापासून दूर आहे. त्याला ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नाही. खरे तर हसन अलीची पत्नी भारतीय आहे. दोन सामन्यांमध्ये यजमान इंग्लिश संघाने विजय मिळवून मालिका २-० ने खिशात घातली. तेव्हाही हसन अली पाकिस्तानच्या संघाचा हिस्सा नव्हता. तो इंग्लंडमध्ये आयोजित टी-२० ब्लास्टमध्ये खेळत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img