लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेची ( Rajya Sabha ) खासदारकी मिळणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांची राष्ट्रवादी देखील फुटणार आहे. आमदार आणि नेते देखील त्यांना सोडून जातील त्यामुळेच त्यांनी घरातच खासदारकी दिली आहे. जेणे करून ते पद घराबाहेर जाणार नाही.
Rohit Pawar काय म्हणाले रोहित पवार?
अजित पवारांसोबत गेलेली नेते हे विकास निधीसाठी गेले आहेत. तसेच त्यांना पद हवा होतं किंवा त्यातील बहुतांशी नेत्यां मागे एडी किंवा सीबीआयची चौकशी लागलेली होती. त्यामुळे त्यांच्या स्वार्थासाठी ते अजित पवार आणि भाजप सोबत केले आहे. त्यात त्यांना खासदारकी मिळाल्यास ते भाजपसोबत जायलाही कमी करणार नाहीत. त्यामुळेच अजित पवार यांनी खासदारकी आपल्याच घरात राहावी जेणेकरून कुणी खासदार आपल्याला सोडून जाणार नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना खासदारकी देण्यात आली आहे. असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांची राष्ट्रवादी देखील फुटणार आहे. असा दावा केला आहे.
संभाजीराजे यांनी केले कृषिमंत्री धनंजय मुंडेंना टार्गेट
दरम्यान बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार आज (13 जून) दुपारी दीड वाजता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभेसाठी मंत्री छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी, पार्थ पवार आणि आनंद परांजपे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. यानंतर सुनेत्रा पवार आजच उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळाली आहे. प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न विचारला जात होता. काल पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरेंनी गुरुवारी सकाळी राज्यसभेसाठीच्या उमेदवारांची नावं जाहीर करू असे सांगितले होते.