5.5 C
New York

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल

Published:

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार (Ajit Pawar) गटाच्या वतीने राज्यसभेसाठी सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांनी आज विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर निवडणूक पार पडत आहे. या जागे करिता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने अनेक जणांची नावे चर्चेत होती. मात्र अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामार्फत करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालं होतं. पराभवामुळे खचून गेलेल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं आणि केंद्रीय योजनांचा थेट फायदा मतदारसंघासाठी व्हावा, यासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांना केंद्रामध्ये मंत्रिपदाची संधी मिळेल, असं सांगितलं जातंय. मोदी सरकराच्या नुकत्याच झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळालेलं नव्हतं. मात्र आता सुनेत्रा पवारांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागू शकते. सुनेत्रा पवार विजयी होण्याइतपत संख्याबळ असल्यानेच अजित पवार यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट आहे. बारामतीला शरद पवार, सुप्रिया सुळे व आता सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून तीन खासदार मिळतील. बारामती लोकसभा मतदारसंघाचा या निमित्ताने केंद्रीय निधीतून मोठा विकास होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वतीने महायुतीच्या उमेदवार होत्या. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक होती. अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष या निवडणुकी मधून दिसून आला मात्र अखेर सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना पराभूत केले. त्यानंतर आता राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात यावी अशी बारामतीतील अनेक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. त्यानंतर अखेर आता सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या सोबतच छगन भुजबळ यांचे देखील या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी नाव चर्चेत होते.

सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभेचे उमेदवारी अर्ज आज दाखल केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img