8.7 C
New York

Navi Mumbai : नवी मुंबईत 1 कोटीचे साहित्य चोरल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Published:

ठाणे

नवी मुंबईतील (Navi Mumbai) तुर्भे एमआयडीसी (MIDC) परिसरातील एका कंपनीच्या बांधकाम साइटवरून 1 कोटी 61 हजार रुपयांचे साहित्य चोरी गेल्याची घटना घडली आहे. कंपनीचे बनावट लेटरहेडवर उपाध्यक्षाचे बनावट सही करून गेट पास तयार करत साहित्याची चोरी केली आहे. या प्रकरणात ठाणे पोलिसांकडून साहित्य चोरल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे बनावट लेटरहेड आणि कंपनीच्या उपाध्यक्षांची बनावट स्वाक्षरी करून 19 आणि 20 मे रोजीच्या मध्यरात्री कंपनीतील माजी सहाय्यक व्यवस्थापक यांच्यासह इतर दोन जणांनी चोरी केली आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणात तीनही आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये पराग सुरेश सावंत, ज्या कंपनीचे बांधकाम सुरू होते त्या कंपनीचे माजी सहाय्यक व्यवस्थापक, शिवा शिंगे, इलेक्ट्रीशियन राजकुमार बेरवा आणि भंगार विक्रेता बबलू सोनके अशी आरोपींची नावे आहेत. हॅलो कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारी नुसार ठाणे पोलिसांच्या वतीने भारतीय दंड संहिता कलम 381, 467, 468, 471 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवंतने लेटरहेडवर कंपनीच्या उपाध्यक्षांची बनावट स्वाक्षरी करून बनावट गेट पास तयार केला होता, त्यानंतर ते साहित्य बांधकामाच्या जागेतून बाहेर काढले गेले आणि नंतर भंगार विक्रेत्याला विकले गेले. या साहित्यात पंखे, दरवाजे, इलेक्ट्रिकल फिटिंग्ज, इनडोअर आणि आऊटडोअर कॉम्प्रेसर, पॅनल्स, यूपीएस सेट यासारख्या महागड्या वस्तूंचा समावेश होता, असे तक्रारीच्या हवाल्याने अधिकाऱ्याने सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img