19.7 C
New York

Nagpur News : नागपूरमधील कंपनीत मोठा स्फोट, 5 कामगारांचा मृत्यू

Published:

नागपूर

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध कंपन्यांमध्ये स्फोट होण्याची आणि आगीच्या घटना घडत आहे. डोंबिवली नंतर नागपूर (Nagpur) मध्ये एका कंपनीमध्ये मोठा स्फोट (Blast) झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरच्या (Nagpur News) धामणा येथील चामुंडी एक्सप्लोजीव कंपनीत (Chamunda Company) हा स्फोट झाला आहे. नागपूर ते अमरावती महामार्गावरही कंपनी आहे. या स्फोटामध्ये 5 कामगारांचा मृत्यू तर 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ते अमरावती महामार्गा वरील कंपनीमध्ये दुपारी एकच्या सुमारास मोठा स्फोट झाला आहे. कंपनीमध्ये काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. कंपनीतील काही कामगार जेवणाच्या सुट्टीसाठी गेले होते तर काही जण काम करत होते. या स्फोटामध्ये 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले. स्फोटाची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत. जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये नेले. जखमींवर सध्या नागपूर सेनगुप्ता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. जखमींची प्रकृती गंभीर आहे. स्फोटातील जखमी आणि मृत कामगार हे शेजारच्या धामणा गावातील आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img