0 C
New York

Ketki chitle : केतकी चितळेचा राज्यसरकारवर हल्लाबोल

Published:

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. केतकी चितळेने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत तिचं मत व्यक्त केलं आहे. राज्यातील महायुतीसरकारवर तिने आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘तीन चाकी सायकलनी बहुतेक प्रचंड मनावर घेतले आहे की आपण कसे पडून दाखवायचे ते’, अशा शिर्षकाखाली तिने आपला व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. राज्यातील ​’वक्फ’ मंडळाचं बळकटीकरण करण्यासाठी सरकारनं 10 कोटींच्या निधीची तरतूद ​केलीय. त्यापैकी 2 कोटी रुपये ​10 जूनला वितरीत केल्याचा शासन आदेश अल्पसंख्यांक विकास विभागानं काढला आहे. त्यावरून केतकी चितळेने राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. तिने यावेळी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Ketki chitle काय म्हटलं आहे अभिनेत्री केतकी चितळेंने आपल्या पोस्टमध्ये?

एक धक्कादायक बातमी वाचून मी उठले आहे. त्यामुळे काय बोलावं काहीच कळत नाही. ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही. त्यांच्या बळकटीकरणासाठी तुम्ही त्यांना १० कोटी रूपये दिले आहेत. तुम्ही बधीर आहात, की आम्हाला बधीर करून सोडणार आहात? मी नेहमी म्हणत होते, लोकसभेत कोणाला मत द्यायचंय ते ठरलेलं आहे. त्यात काही प्रश्न नव्हता. मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं, पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे. हे मी आधीपासून म्हणत होते पण तुम्ही तर आता माझं मत तुम्ही खरं करून दाखवणार आहे.

तर जिंकलो असतो; शिवतारेंचा अजितदादांवर निशाणा

देशात सर्वत्र मोर्चे निघत आहेत. वक्फ बोर्डाला खारीज करा आणि तुम्ही वक्फ बोर्डला १० कोटी रूपये देत आहात.आधीच तीन तिघाडी सरकार आहे तुमचं. तुम्ही ठरवलं आहे का, की हिंदु तुमच्या बाजूला नकोयत, म्हणणं काय आहे तुमचं? आधीच तीन तिघाडी सरकार आहे..एक परत आपल्या काकाकडे जाणार आणि म्हणणार काका मला माफ करा, मला परत घ्या, दुसरी व्यक्ती म्हणते तीन चाकी सायकल चालवता येत नाहीये. त्यामुळे मी पुन्हा एकदा तीन चाकी रिक्षा चालवायला निघतो, असं म्हणणार आहे, तर तिसरा माझा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, माझा राजीनामा घ्या, म्हणून तुम्ही हा दरीद्रीपणा करणार आहेत का असा सवाल केतकीने उपस्थित केला आहे.

या व्हिडीओमधून तिने राज्य सरकारसह अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

‘हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी’ केतकीची जुनी पोस्ट चर्चेत
दोन दिवसांपुर्वी आपल्या सोशल मिडीया पोस्टमध्ये केतकीने ”हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी”, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. अभिनेत्री केतकी चितळेने पंतप्रधानांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर ”हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी” असे कॅप्शन लिहण्यात आले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img