18.8 C
New York

Terror Attack : जम्मूतील हल्ल्यांचा बदला घेण्यास भारत सज्ज

Published:

काश्मिरातील दहशतवादी हल्ल्यांचं लोन आता शांत असलेल्या (Terror Attack) जम्मूत येऊन पोहोचलं आहे. मागील चार दिवसांत जम्मूमधील चार जिल्ह्यांत दहशतवादी हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. सर्वात आधी रियासी येथे भाविकांच्या बसवर हल्ला झाला. यानंतर कठुआमध्ये आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यानंतर डोडा येथे दोन ठिकाणी हल्ला केला. जम्मूतील तीन जिल्ह्यांत (Jammu Terror Attack Update) चार अतिरेकी घुसले आहेत. यानंतर भारतीय सुरक्षा दल अलर्ट मोडमध्ये आले आहे. या सगळ्या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. जंगलातही सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.

डोडात झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी चार अतिरेक्यांचे स्केच जारी केले आहे. हे अतिरेकी भद्रवाह, थाथर आणि गंदोह या भागात फिरत आहेत. या अतिरेक्यांची माहिती देणाऱ्यांना पाच लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या अतिरेक्यांची माहिती देता यावी यासाठी पोलिसांनी काही फोन नंबर जारी केले आहेत. माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव उघड केलं जाणार नाही. प्रत्येक अतिरेक्याची माहिती देणाऱ्याला पाच-पाच लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे.

डोडात आता सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. थाथरी भागात वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. लोकांना त्यांची ओळखपत्रे पाहून तपासणी केली जात आहे. तसेच या भागात शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. जम्मूतील डोडा जिल्ह्यात काल रात्र सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक झाली. अतिरेक्यांनी पोलीस आणि अर्धसैनिक तुकडीवर गोळीबारास सुरुवात केली. या हल्ल्यात एक कॉन्स्टेबल जखमी झाला. याआधी मंगळवारीही दहशतवादी हल्ला झाला होता. भद्रवाह-पठाणकोट रस्त्यावरील चटरगल्ला भागातील चेकपोस्टवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान आणि एक विशेष पोलीस अधिकारी जखमी झाला होता.

कुवैतमध्ये इमारतीला भीषण आग, 41 जणांचा मृत्यू

या हल्ल्यांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. ज्या दहशतवाद्यांनी कोटा टॉपमध्ये हल्ला केला त्याच दहशतवाद्यांनी चटरगल्लात हल्ला केला का याची खात्री होऊ शकलेली नाही. दोन ठिकाणांमध्ये जवळपास शंभर किलोमीटरचं अंतर आहे. जंगल मार्गाने सात ते आठ तासांत हे अंतर पूर्ण केलं जाऊ शकतं.

याआधी मंगळवारी रात्री कठुआतील सायदा गावात अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यानंतर चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन अतिरेक्यांना ठार केले. यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. तसेच या हल्ल्यात एक स्थानिक नागरिक जखमी झाला. मारले गेलेले दोन्ही अतिरेकी पाकिस्तान लगतच्या आंतरराष्ट्रीय हद्दीतून जम्मूत दाखल झाले होते. यानंतर कठुआ भागात पोलीस आणि अर्धसैनिक दलाचे पथक अन्य अतिरेक्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, सर्वात आधी जम्मूतील रियासी भागात भाविकांच्या बसवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. या बसमधील भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या अतिरेक्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात नऊ लोकांचा मृत्यू झाला तर तीस पेक्षा जास्त भाविक जखमी झाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img