19.7 C
New York

IND vs USA : इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहणारा ‘तो’ अमेरिकेचा स्टार झाला

Published:

T20 वर्ल्ड कप 2024 टुर्नामेंटमध्ये भारत-अमेरिकेत (IND vs USA) काल न्यू यॉर्कमध्ये रोमांचक सामना झाला. भारताने 10 चेंडू आणि 7 विकेट राखून या मॅचमध्ये अमेरिकेवर विजय मिळवला. त्याचबरोबर टीम इंडियाने सुपर-8 मध्ये सुद्धा क्वालिफाय केलय. केवळ 111 धावांच लक्ष्य अमेरिकेने भारतासमोर विजयासाठी ठेवलं होतं. टीम इंडिया सोप लक्ष्य असूनही सहजतेने लक्ष्यापर्यंत पोहोचली नाही. अमेरिकी गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. टीम इंडियाला पहिला धक्का दिला विराट कोहलीच्या रुपाने मूळचा मुंबईकर असलेल्या अमेरिकेच्या सौरभ नेत्रवाळकरने दिला. विराटला त्याने भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर रोहित शर्माला 3 धावांवर पॅव्हेलियनची वाट धरायला लावली. सौरभने टीम इंडियाला अडचणीत आणलं होतं. सौरभ नेत्रवाळकर स्वत:ला मात्र, तरीही दोष देत होता.

सौरभ नेत्रवाळकरने भारता विरुद्ध शानदार गोलंदाजी केली. 2 महत्त्वाच्या विकेट त्याने 4 ओव्हरमध्ये 18 धावा देऊन काढल्या. त्यामुळे टीम इंडिया दबावात आली. ऋषभ पंतच्या रुपाने 8 व्या षटकात टीम इंडियाचा तिसरा विकेट गेला. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांना एक-एक रन्स जमवण्यासाठी मेहनत करावी लागली. त्यानंतर आवश्यक धावगती हळू-हळू वाढू लागली. 12.3 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 58 धावा झाल्या होत्या. सूर्यकुमार यादव 22 रन्स करुन क्रीजवर होता.

पाकिस्तानी गोलंदाजाने शेअर केली वैष्णोदेवी हल्ल्याची पोस्ट

IND vs USA सूर्या-नेत्रवाळकर कधी एकत्र खेळलेत

13 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर बाऊंड्री मारण्याचा प्रयत्न सुर्याने आवश्यक धावगती वाढवण्यासाठी केला. त्याने नेत्रवाळकरकडे झेल दिला. पण त्याच्या हातातून ही महत्त्वाची कॅच सुटली. त्यानंतर सूर्या खूपच सावध झाला. सामन्यानंतर नेत्रवाळकरने ही कॅच सोडल्याबद्दल खंत व्यक्त केली. सौरभ नेत्रवाळकर आणि सूर्यकुमार यादव अंडर-15 मध्ये एकत्र खेळले आहेत. त्याने या सगळ्याची जबाबदारी घेतली. भारतावर सूर्याची कॅच पकडली असती, तर दबाव वाढला असता असं नेत्रवाळकर म्हणाला.

IND vs USA अमेरिकेचा आज मोठा स्टार

सौरभ नेत्रवाळकर आता अमेरिकन क्रिकेट टीमसाठी मोठा स्टार बनलाय कधी काळी टीम इंडियाकडून खेळण्याच स्वप्न पाहणारा तो. भारताकडून अंडर-19 मध्ये तो खेळलाय. आता अमेरिकेसाठी T20 मध्ये तो जबरदस्त कामगिरी करतोय. कॅनडा विरुद्ध त्याला एकही विकेट मिळाला नव्हता. पण पाकिस्तान विरुद्ध अमेरिकेच्या पहिल्या मोठ्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img