2.2 C
New York

Ajit Doval : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी तिसऱ्यांदा डोवाल यांची नियुक्ती

Published:

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पुन्हा एकदा अजित डोवाल (Ajit Doval) यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पीके मिश्रा पंतप्रधानांचे प्रधान सचिव पदावर कायम राहणार आहेत. या संदर्भात जारी केलेल्या पत्रात मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अजित डोवाल यांची आयपीएस (निवृत्त) यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली असून, ही नियुक्ती 10 जूनपासून लागू होईल असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Ajit Doval Appointed As National Security Advisor For Third Time)

अजित डोवाल यांची 20 मे 2014 रोजी पहिल्यांदा देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून डोवाल हे या पदावर आहेत. त्यांच्या आधी शिवशंकर मेनन हे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. 1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अजित डोवाल हे कूटनीती आणि काउंटर टेरेरिज्मचे तज्ज्ञ मानले जातात.

नवी मुंबईत 1 कोटीचे साहित्य चोरल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या काळात पीके मिश्रा यांना पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव बनवण्यात आले होते. दुसऱ्या टर्ममध्येही अजित डोवाल आणि पीके मिश्रा यांचे स्थान कायम राहिले. त्यानंतर आता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यानंतरही डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तर, पीके मिश्रा यांनादेखील मोदींचे तिसऱ्यांदा प्रधान सचिव बनवण्यात आले आहे.

Ajit Doval पंतप्रधानांचा सर्वात विश्वासू अधिकारी असतो NSA

NSA पदावर काम करणारा अधिकारी हा पंतप्रधानांच्या अतिशय जवळचा मानला जातो. डोवाल यांची तिसऱ्यांदा नियुक्ती हेच दर्शवते की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोवाल यांच्यावर किती विश्वास आहे. NSA हे संवैधानिक पद असून, राजकीय तसेच देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीतही NSA पंतप्रधानांना मदत करतात. तसेच केव्हा आणि कोणता निर्णय घेणे योग्य ठरेल याबद्दलही NSA पंतप्रधानांना सल्ला देण्याचे काम करतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img