5.5 C
New York

Congress : पुन्हा राजकीय भूकंप?; काँग्रेसच्या ‘या’ आमदारांचा राजीनामा…कारण

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकी (Loksabha Elections) नंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामे दिले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये 7 आमदार विजयी झाले आहे. त्यामुळे आता आमदारकीचा (MLA) राजीनामा (Resigne) द्यावा लागणार आहे. यापैकी काँग्रेसच्या (Congress) दोन आमदारांनी आज राजीनामा दिला आहे. आता दिल्ली दरबारी आपला आवाज बुलंद करणार आहे.

राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये सोलापूर दक्षिणच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर खासदार झाल्या आहेत. तर, बळवंत वानखेडे हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते, त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून 19731 मतांनी नवनीत राणा यांचा पराभव केला आहे. त्यामुळे, हे दोन्ही आमदार आता खासदार बनून दिल्लीत जात आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून 48 खासदार दिल्ली दरबारी निवडून गेले आहे. त्यापैकी महाविकास आघाडीचे 30 तर महायुतीचे 17 उमेदवार विजयी झाले आहे. सांगली मधून 1 अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहे. राज्यातील विधानसभेतील 7 आमदार या निवडणुकीमध्ये विजयी झाल्याने ते आता खासदार झाले आहे. त्यामुळे त्यांना विधान सभेचा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. लोकसभेचे विशेष अधिवेशन 20 जून पासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी या साही आमदारांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. यामध्ये काँग्रेसचे चार आमदारांचा समावेश असून शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदारांचा समावेश आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा समावेश आहे.

विदर्भातील विधानसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर आमदार होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. तर मराठवाड्यातील संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत ते खासदार झाले आहेत. तर आमदार कल्याण काळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघात पराभव केला. कल्याण काळे यांना 607897 मतं मिळाली. काळे यांनी दानवे यांचा 109958 मतांनी पराभव केला. मुंबईत शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली. रवींद्र वायकर यांनी 48 मतांनी अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला. काँग्रेस नेत्या आणि आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल निकम यांना पराभूत केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img