15.5 C
New York

Mumbai Malad News : बाई गं ! चक्क आईस्क्रिमच्या कोनमध्ये सापडलं तुटलेलं बोट

Published:

मुंबईतील मालाड (Mumbai Malad News) मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीमच्या (Ice Cream) कोनमध्ये एका महिलेला चक्क मानवी बोटाचा तुकडा सापडला आहे. महिलेने मलाड पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिसांनी (Malad Police) याप्रकरणी यम्मो या आईस स्क्रीम (Yummo Ice Cream) कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सापडलेले मानवी बोट फॉरेन्सिककडे पाठवले आहेत. मलाड पोलिसांनी (Malad Police) याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी तात्काळ ते मानवी बोट फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले आहे. आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्याचाही शोध घेण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेमुळे आता ऑनलाईन पद्धतीने एखादी वस्तू ऑर्डर करावी की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मालाड पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेत आईस्क्रिम कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आईस्क्रिममध्ये सापडलेलं मानवी बोट फॉरेन्सिककडे तपासणीसाठी पाठवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. ब्रेंडन सेराओ (२७) असं तक्रार करण्याऱ्या महिलेचं नाव आहे. सेराओ या स्वत: एक डॉक्टर आहेत. घडलेल्या प्रकारानंतर ब्रेंडन यांनी क्षणाचाही विलंब न करत पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला.

काही गोष्टी झाल्या तर ठीक, नाही झाल्या तर.. शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Mumbai Malad News नेमकं प्रकरण काय ?

मलाडमधील ओरलेम येथील रहिवासी ब्रेंडन सेराओ (27) यांनी बुधवारी ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे आईस्क्रीम मागवले होते. त्यांनी यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन ऑर्डर केला होता. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार महिलेला आईस्क्रीम कोनच्या आत सुमारे 2 सेमी लांबीचा मानवी बोटाचा तुकडा आढळला. सेराओ या व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना आईस्क्रीममध्ये काय आहे ते तात्काळ समजले.काहीक्षण तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजलं नाही. पण त्यांना सर्व प्रकार समजल्यानंतर तात्काळ मलाड पोलीस ठाणे गाठले. त्यांनी याबाबत पोलिसांत धाव घेत आपली तक्रार दाखल केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img