Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या तिच्या लग्नाच्या बातमीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. येत्या २३ जूनला सोनाक्षी विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला एकत्र दिसतात. इंडस्ट्रीमध्ये दोघांना बऱ्याचवेळा एकत्र पाहिलं गेलं आहे. सोनाक्षी आणि झहीरला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. या दरम्यान सोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांची पहिलीच प्रतिक्रिया समोर आलीये.
Sonakshi Sinha: एका मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, सध्या मी दिल्लीत आहे. मुलीची तिच्या लग्नाबद्धलची काय योजना आहे त्याबद्धल मला फारसं काही माहिती नाहीये. सोनाक्षी लग्न करणार आहे का? असा तुमचा प्रश्न आहे. आतापर्यंत मला तरी याबद्धल काही सांगण्यात आलेलं नाही. मला सुद्धा माध्यमांतूनच कळतंय की ती लग्न करणार आहे. जेव्हा आम्हाला सांगेल तेव्हा आमचे आशीर्वाद तिच्या पाठीशी नेहमीच असतील. जगातलं सर्व सुख त्यांना मिळावं अशी माझी एकच इच्छा आहे.
ती प्रौढ आहे
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मला माझ्या मुलीवर पूर्णपणे विश्वास आहे. ती कोणताच चुकीचा निर्णय घेणार नाही. ती प्रौढ आहे आणि आता स्वतःचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते. जेव्हा माझ्या मुलीचं लग्न होईल तेव्हा मी तिच्या लग्नाच्या वरातीमध्ये नाचणार आहे.
मुलं पालकांना कुठे विचारतात?
पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणतात की, मला खूप जणांनी विचारलं आहे की, तुम्हाला याबद्धल माहिती नाही आणि मीडियाला सर्व काही माहिती आहे. यावरून मी एवढंच सांगू शकतो की आजकालची मुलं आई-वडिलांना कुठे विचारतात? फक्त येऊन सांगतात. आणि मी सुद्धा फक्त सांगण्याची वाट पाहत आहे.
‘मिर्झापूर सीझन 3’ साठी व्हा तयार! रिलीज डेट आली समोर
जहीर इक्बाल कोण आहे ?
झहीर इक्बाल हा अभिनेता आहे. १० डिसेंबर १९८८ रोजी झहीरचा जन्म झाला. झहीरने मुंबई स्कॉटिश स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केलं आहे. झहीरचे वडील इक्बाल रतनसी हे एक ज्वेलर्स चालवतात आणि व्यापारी आहेत. एवढंच नव्हे तर झहीर सलमान खानचा मित्र आहे. तर झहीरची आई ही गृहिणी आहे. झहीरचा लहान भाऊ कम्प्युटर इंजिनिअर आहे तर बहीण ही स्टायलिस्ट आहे.