9 जूनला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली. पंतप्रधानांसोबत भाजप आणि मित्रपक्षांच्या 71 मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. मोदी सरकारचे (Modi Government) नव्याने अस्तित्वात आलेले मंत्रिमंडळ अत्यंत सुशिक्षित आणि वैविध्यपूर्ण आहे. मंत्र्यांनी जगभरातील विद्यापीठांमधून विविध विषयांमध्ये पदवी धारण केली आहे. मोदी सरकारमधील याच मंत्र्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा आढावा आपण या वृत्तात घेणार आहोत. हा लेख विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यास आणि परीक्षेची तयारी करण्यासही मदत करतो.
Modi Government पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मंत्र्यांची शैक्षिणक पार्श्वभूमी :
नरेंद्र मोदी – पंतप्रधान
शैक्षणिक पात्रता: M.A. राज्यशास्त्र, गुजरात विद्यापीठातून
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
शैक्षणिक पात्रता: M.Sc, गौरखपूर विद्यापीठ
अमित शहा – गृह मंत्री आणि सहकार मंत्री
शैक्षणिक पात्रता: S.Y. बी.एससी, गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद
नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
शैक्षणिक पात्रता : M.Com आणि LL.B, नागपूर विद्यापीठ.
सुप्रीम कोर्टाचे ‘नीट’बाबत अहवाल देण्याचे निर्देश
JP नड्डा – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, रसायने आणि खते मंत्री.
शैक्षणिक पात्रता : LL.B. हिमाचल प्रदेश विद्यापीठ, शिमला
शिवराज सिंह – कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री
शैक्षणिक पात्रता: M. A. (तत्वज्ञान), बरकतुल्ला विद्यापीठ भोपाळ, सुवर्ण पदक विजेता.
श्रीमती. निर्मला सीतारामन – अर्थमंत्री
शैक्षणिक पात्रता: M.A. अर्थशास्त्र आणि एम.फिल. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली.
डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहार मंत्री.
शैक्षणिक पात्रता: M.A. राज्यशास्त्र, एम.फिल, आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारणमध्ये पीएचडी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली.
मनोहर लाल खट्टर – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, उर्जा मंत्री
शैक्षणिक पात्रता: B.A. दिल्ली विद्यापीठ.
एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री, पोलाद मंत्री.
शैक्षणिक पात्रता: B.Sc. नॅशनल कॉलेज, जयनगर, बंगलोर विद्यापीठ
पियुष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री
शैक्षणिक पात्रता : CA आणि LL.B मुंबई विद्यापीठ
धर्मेंद्र प्रधान – शिक्षणमंत्री
शैक्षणिक पात्रता: M.A. मानववंशशास्त्र, उत्कल विद्यापीठ भुवनेश्वर
जीतन राम मांझी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
शैक्षणिक पात्रता: ग्रॅज्युएट, मगध विद्यापीठ
राजीव रंजन सिंग उर्फ ललन सिंग – पंचायत राज मंत्री, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री.
शैक्षणिक पात्रता: B.A (ऑनर्स), भागलपूर विद्यापीठ.
सर्बानंद सोनोवाल – बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री
शैक्षणिक पात्रता: B.A (ऑनर्स), एलएलबी – डिब्रूगड विद्यापीठ आणि B.J.C गुवाहाटी विद्यापीठ
डॉ. वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री
शैक्षणिक पात्रता: M.A. (अर्थशास्त्र), पीएच.डी (बालकामगार) डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठ, सागर, मध्य प्रदेश
किंजरापू राममोहन नायडू – नागरी विमान वाहतूक मंत्री
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनीअर, पर्ड्यू युनिव्हर्सिटी, युनायटेड स्टेट्स, MBA लाँग आयलँड विद्यापीठ
प्रल्हाद जोशी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री.
शैक्षणिक पात्रता: B.A. कर्नाटक विद्यापीठ
जुआल ओरम, आदिवासी व्यवहार मंत्री
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल डिप्लोमा, उत्कलमणी गोपबंधू इन्स्टिट्यूट
गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्री.
शैक्षणिक पात्रता: B.A. मगध विद्यापीठ
अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री
शैक्षणिक पात्रता: MBA व्हार्टन बिझनेस स्कूल, युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया, यूएसए. M. Tech, IIT कानपूर
ज्योतिरादित्य एम. सिंधिया – दळणवळण मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री.
शैक्षणिक पात्रता: MBA, स्टँडफोर्ड विद्यापीठ
भूपेंद्र यादव- पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
शैक्षणिक पात्रता: LLB, अजमेर विद्यापीठ
गजेंद्रसिंह शेखावत – सांस्कृतिक मंत्री, पर्यटन मंत्री
शैक्षणिक पात्रता: M.A. जोधपूर विद्यापीठ
श्रीमती. अन्नपूर्णा देवी- महिला व बालविकास मंत्री
शैक्षणिक पात्रता : M.A. इतिहास, रांची विद्यापीठ
किरेन रिजिजू – संसदीय कामकाज मंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री
शैक्षणिक पात्रता: LL.B, कॅम्पस लॉ सेंटर, दिल्ली विद्यापीठ.
जी. किशन रेड्डी – कोळसा मंत्री, खाण मंत्री
शैक्षणिक पात्रता: डिप्लोमा इन टूल डिझाईन, CITD
चिराग पासवान – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
शैक्षणिक पात्रता: इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी
सी आर पाटील – जलशक्ती मंत्री
शैक्षणिक पात्रता: ITI, सूरत