3.6 C
New York

Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात घ्या केसांची ‘अशी’ काळजी!

Published:

Monsoon Hair Care Tips: पावसाळा सुरु होताच आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. पावसाळ्यात आपल्या आहाराबरोबरच केसांच्या आरोग्याकडेसुद्धा लक्ष देणे फार महत्वाचं आहे. नाही तर तुम्ही केसांचं सौंदर्य गमावू शकाल. पावसाळ्यात हवा खुप जास्त असते त्यामुळे पावसात हवेतील ओलाव्यामुळे केसांशी संबंधित समस्या अधिक वाढतात. उदाहरणार्थ. कोंडा होणे,(Dandruff) केस गळणे, (Hair Fall) केस चिकट होणे, (Sticky Hair) टाळूवर इन्फेक्शन होणे (Scalp Infection) या सगळ्या गोष्टींसाठी बळी पडावं लागत, त्यामुळे केसांची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Monsoon Hair Care Tips: मुख्य म्हणजे पावसात कधीही केस बांधून ठेवायचे नाहीत. यामुळे केसांची मूळं ओली राहतात आणि डोक्यात खाज येण्यास सुरुवात होते. पावसात केसांचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी केस धुतल्यानंतर केसांना चांगले पुसून त्यांना सिरम लावणेही गरजेचं आहे. यामुळे केसांची चमक वाढते आणि केस दाट व मजबूत राहतात. पावसाच्या सिझनमध्ये जास्त मसालेदार वर तेलकट पदार्थ खाऊ नयेत त्याचा परिणाम तुमच्या केसांवर होतो. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने केस गळण्याच्या समस्या वाढू लागतात. पावसात बाहेर कुठे जायचं असेल तर केसांना स्कार्फ गुंडाळावा. पावसाळ्यात केसांच्या आरोग्यावर लक्ष देणे महत्वाचे आहे. चला तर मग जाणूनच घेऊया पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची.

नियमित केसांना तेल लावणं गरजेचं
केसांच्या आरोग्यासाठी तेल हे खूप उपयुक्त आहे त्यामुळे केसांची मुळे मजबूत कारण्यासाठी तेल लावणं महत्वाचं आहे. यामुळे केसांची वाढ व्हायला मदत होते आणि टाळू देखील निरोगी राहते. त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा केसांना तेल लावणं थांबवू नये. आठवड्यातून ३ वेळा रात्री झोपताना केसांना तेल लावून चांगला मसाज करा आणि सकाळी शॅम्पूने केस स्वछ धुवावे.

केसांना कंडिशनर लावणे
पावसात हवेतील जास्त आद्रतेमुळे केस लवकर कोरडे होतात. अशा परिस्थितीत शॅम्पूनंतर कंडिशनर लावणं गरजेचं आहे. कंडिशनर लावण्याने केसांचा गुंता होत नाही. आणि केस एकदम बहरल्यासारखे राहतात. केसांच्या मजबुतीसाठी नियमितपणे केस धुतल्यावर कंडिशनर लावावे.

पावसाळ्यात योग्य छत्री कशी निवडाल ? लक्षात ठेवा फक्त या ३ गोष्टी

टॉवेलचा वापर
पावसाच्या पाण्यामुळे केस गळतीचे प्रमाण जास्त वाढते. अशावेळी केसांना फक्त तेल लावणे, शॅम्पू लावून केस धुवणे आणि त्यानंतर कंडिशनर लावणे पुरेसं नसतं. यांच्यासोबतच चांगल्या प्रतीचा टॉवेल केस सुखवण्यासाठी वापरणं गरजेचं आहे. पावसात ओले केस सुखवण्यासाठी मायक्रो टॉवेलचा वापर केलेला चांगला असतो. यामुळे केसांमधील पाणी चांगल्या पद्धतीने शोषलं जात आणि केस सुद्धा तुटत नाहीत.

ओल्या केसांवर कंगवा फिरवू नका
घाईघाईत असलेल्या महिला नेहमीच केस वॉश करून केसांवर कंगवा फिरवतात आणि बाहेर पडतात. पण असं करण केसांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. ओले केस आधी कोरडे होईपर्यंत टॉवेलने पुसावे आणि त्यांनंतरच कंगवा केसांमध्ये फिरवावा. ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवल्यास केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस अधिक प्रमाणात गळू लागतात त्यामुळे आपल्या टाळूवर संसर्ग होण्याची शक्यता असते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img