मुंबई
लोकसभा निवडणूक (Loksabha Election) झाल्यानंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तयारीला लागले आहेत. आता विधानसभा निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाची असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. यासंदर्भात मनसेची 13 जून रोजी महत्वाची बैठक होणार आहे. अशामध्ये मनसे महायुतीकडे (Mahayuti) मुंबई आणि परिसरातील 20 जागांची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्यासाठी राज्यातील महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. त्यावेळी भाषणादरम्यान राज ठाकरे म्हणाले होते कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे त्यामुळे आता मनसे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आहे. महायुतीमधून मनसे जागा लढवणाऱ्या संदर्भात चाचणी सुरू आहे. मनसे विधानसभा निवडणुकीत 20 जागा मागण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि पुणे या विभागाचा असण्याची शक्यता आहे. मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतील संदीप देशपांडे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे
राज ठाकरे विधानसभेसाठी महायुतीकडे मुंबई आणि परिसरातील 20 जागांची मागणी करत असल्याची माहिती आहे. मुंबईतील मराठी नागरिक राहत असलेले परिसर म्हणजेच दादर, वरळी, लालबाग, वर्सोवा, दिंडोशी, जोगेश्वरी, घाटकोपर पश्चिम, कल्याण, ठाणे, चेंबूर, भिवंडी, नाशिक, पुणे या जागांची मनसे चाचपणी करत आहे. 4 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या नेत्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा देखील करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
मनसेचे संभाव्य इच्छुक उमेदवार
दादर – माजी आमदार नितीन सरदेसाई
वर्सोवा – मनसे नेत्या शालिनी ठाकरे
वरळी – संदीप देशपांडे
शिवडी / नाशिक – बाळा नांदगावकर