3 C
New York

Mumbai Rain : हवामान खात्यानं वाढवली मुंबईकरांची चिंता

Published:

मुंबईसह राज्यभरात नुकतीच पावसाला सुरूवात झाली आहे. Mumbai Rain पाऊस सर्वत्र पडत नाहीतर हवामान खात्यानं मुंबईकरांची चिंता वाढवणारी शक्यता वर्तविली आहे. हवामान बदलामुळे मुंबईमध्ये जुलै महिन्यात पावसाचे थैमान पाहायला मिळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. इतकंच नाहीतर मुंबईत कमी वेळात जास्त पाऊस कोसळणार असेही हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. जुलै महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता असल्याची माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

हवामान विभागन दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रावर अंशतः ढगाळ आकाश राहील. दक्षिण कोकण आणि गोव्याच्या काही भागांवर ढगांचा पट्टा पसरलेला आहे. या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. सोलापूरमध्येही ढगाळ वातावरण असून, अधूनमधून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच रायगडमध्ये आजपासुन पुढील चार दिवस जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

डोंबिवली स्फोटाने पुन्हा हादरली

Mumbai Rain यंदा राज्यात लवकरच चांगल्या पावसाला सुरुवात

दरवर्षीपेक्षा यंदा राज्यात लवकर चांगल्या पावसाला (Maharashtra Rain) सुरुवात झाली आहे. जून महिन्यात मान्सून जरी महाराष्ट्रात दाखल झाला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस राज्यात पडत नाही. सर्रास जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्यातच राज्यात चांगला पाऊस होत असतो. यावेळी मात्र, जून महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तर काही भागात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे. तर काही भागात शेती पिकांना देखील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं फटका बसला आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img