23.1 C
New York

Maratha Reservation : जरांगेंची उपोषणादरम्यान तब्येत खालावली उपचार सुरू

Published:

अंतरवाली सराटी

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेले मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या अंतरवाली सराटी येथे उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असल्याने राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या शिवसेना नंतर सलाईन लावून उपचार घेण्यास जरांगे पाटील तयार झाले आहे. मात्र राज्य सरकारने शब्द फिरवल्यास उपचार घेणे बंद करणार असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थळावरून दिला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमदार राऊत हे फक्त निरोप घेऊन आले होते. कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, कुणाचाही असो मला कुणाशी घेणंदेणं नाही. 10 महिन्यापासून कोणीही येतं. मध्यस्थी करतं. चर्चा तर झालीच पाहिजे म्हणून मी चर्चा करतो. सरकारने हा विषय तडीस नेतो असं सांगितलं. त्यामुळे मी सलाईन घेतली. पण सरकार बदललं तर मी पुन्हा सलाईन काढेल असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने मागेही 17 दिवस आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं होतं. आताही दुर्लक्ष करतील. लोकसभेला फटका बसला म्हणून दुर्लक्ष केलं तर यापेक्षा दहापट फटका विधानसभेला बसेल. आम्ही उमेदवार दिला नाही तर एका एकाची जिरवल्याशिवाय सोडणार नाही. समाजाचा छळ केला तर आम्हीही वस्ताद आहोत. माझ्याशिवाय समाजाचं पानही हलत नाही. आम्ही खंबीर आहोत. आम्हाला राजकारणात जायचं नाही. तुम्ही आरक्षण द्या. पण तुम्ही मजा बघणार असाल तर तुम्हाला विधानसभेतून आऊट करू. आम्ही फक्त सावध करतोय, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जोपर्यंत काम होत नाही विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत सरकारवर विश्वास नाही. गेल्या 10 महिन्यांपासून सरकारवर विश्वास ठेवत आहे. सगे सोयऱ्याची अंमलबजावणी पाच महिन्यापासून झालेली नाही. एवढा वेळ थोडाच लागतो. आम्ही सलाईन कुणाच्या शब्दाला मान ठेवून लावली ते जाहीरपणे सांगू. निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू तर करा. नाही केली तर आम्ही नाव घेऊन सांगू. आरक्षणाबाबत आज संध्याकाळपर्यंत कळेल. नाही कळालं तर सलाईन काढून फेकू. माझ्यावर विश्वास ठेवा. मी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो असं एका मंत्र्याने रात्री सांगितलं. त्यांच्या शब्दाला मान दिला. एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवूच नये का? शेवटी निर्णय घेणारे तेच आहेत. म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला असं मनोज जरांगे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img