सरकारकडून नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती केली जाणार आहे. जनरल मनोज सी. पांडे यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपणार आहे. दरम्यान, जनरल पांडे हे यापूर्वी 31 मे रोजी निवृत्त होणार होते. (Army) परंतु, सरकारने त्यांचा कार्यकाळ 30 जूनपर्यंत वाढवला होता. (Army Chief ) त्यानंतर लष्कराचे उपप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांची या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. 30 जून रोजी ते या पदाचा पदभार स्वीकारतील. द्विवेदी यांना उत्तर आणि पश्चिम सीमेवर काम करण्याचा मोठा अनुभव आहे.
Army Chief 18 व्या बटालियनमध्ये भरती
मध्य प्रदेशातील रीवा येथील रहिवासी असलेले लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांचा जन्म 1 जुलै 1964 रोजी जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण सैनिक स्कूल, रीवा येथे झालं. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांची 1984 मध्ये लष्कराच्या जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या 18 व्या बटालियनमध्ये भरती झाले.
चंद्राबाबू चौथ्यांदा होणार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री
Army Chief चर्चेत महत्वाची भूमिका
सुमारे 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. लष्कराचे सह-सेनाप्रमुख होण्यापूर्वी लेफ्टनंट जनरल द्विवेदी हे लष्कराच्या उत्तरी कमांडरचे प्रमुख होते. नॉर्दर्न कमांडच्या 2022-24 च्या कार्यकाळात त्यांनी पूर्व लडाखबाबत चीनसोबत सुरू असलेल्या चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Army Chief दहशतवादविरोधी कारवाया
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तसंच, द्विवेदी यांना उत्तर आणि पश्चिम सीमेवर काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्याचबरोबर फक्त दहशतवादाविरोधी नाही तर ईशान्येकडील राज्यांमध्ये दहशतवादाचा मुकाबला करण्याचाही त्यांना अनुभव आहे.