21 C
New York

Konkan Election : कोकण पदवीधर निवडणुकीतून ठाकरे गटाची माघार

Published:

मुंबई

विधान परिषदेच्या शिक्षक (Vidhan Parishad Election) मतदार संघ तसेच पदवीधर मतदार संघ निवडणुकीत (Graduate Constituency Election) अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच सर्वात महत्वाची (Konkan Election) अपडेट समोर आली असून कोकण पदवीधर निवडणुकीतून (Konkan Graduate Constituency) शिवसेना उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) माघार घेत काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, कोकण पदवीधरची जागा ही काँग्रेसला मिळत आहे. काल रात्री आमची याबाबत चर्चा झाली. त्यात नाना पटोले देखील सहभागी होते. प्रत्येक चर्चेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही त्यांच्या सूचनेनुसार आम्ही काम करतो. त्यानुसार किशोर जैन यांचे उमेदवारी आम्ही मागे घेतली आहे असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत म्हणाले की, तसेच नाना पटोले हे मोठे नेते आहेत. ते यापेक्षा मोठे नेते व्हावेत ते आमचे मित्र आहेत. मुंबईचा पदवीधर मतदार संघ गेली 40 वर्षे शिवसेना जिंकते आहे ती आमची परंपरागत जागा आहे. मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघ आमची सेटिंग जागा आहे असे म्हणत या जागेवर फार चर्चा करून उमेदवारी द्यायची गरज नव्हती असेही संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img