मुंबई
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात (South Mumbai Lokssabha) ठाकरेंच्या शिवसेनेचे (Uddhav Thackeray Group) उमेदवार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांचा विजय झाला. तर शिंदे गटाच्या यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकांच्या निकालावरुन भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मोठा आरोप केला आहे. मुंबादेवीमध्ये वोट जिहाद (Vote Jihad) झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोकसभा निवडणुकीत व्होट जिहादचा मुद्दा उपस्थित केला आहे. यानंतर त्यांनी सोशल साईटवर X एक व्हिडिओ जारी केला आहे तसेच रफिक नगर आणि झाकीर हुसेन नगरसह डट्टान बूथमध्ये भाजपला केवळ 66 तर उद्धव ठाकरे सेनेला 5417 मते मिळाली. या बूथवर मुस्लिम मतदारांनी व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच भाजपला येथून पराभवाला सामोरे जावे लागले, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांचा विजय झाला. पण दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात वोट जिहाद झाल्याचा मोठा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. बूथ 191 मध्ये यामिनी जाधव यांना केवळ एकच मत मिळालं आहे. तर, अरविंद सावंत यांना या बूथमध्ये तब्बल 311 मतं पडली आहेत.
किरीट सोमय्या म्हणाले की, मुंबईतील मुंबादेवी येथेही उद्धव ठाकरेंसाठी वोट जिहाद झाल्याचं पाहायला मिळालं. भेंडीबाजार, मोहम्मद अली रोड, चोर बाजार इथे 38 बूथवर महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना एक आकडी मतं मिळाली आहेत. बूथ 191 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना केवळ एकच मत मिळालं, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांना या 311 मतं मिळाली आहेत. वोट जिहाद आता मुंबादेवी मातेच्या चरणीही पोहोचला आहे.