T20 विश्वचषक 2024 मध्ये दररोज रोमांचक सामने होत आहेत. भारताचा तिसरा सामना बुधवार, 12 जून 2024 रोजी होणार असून भारतीय संघाचा सामना युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाशी IND vs USA होणार आहे. दोन्ही संघ न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तिसरा सामना खेळणार आहे. सलग दोन सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला आपली विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे.
IND vs USA दोन्ही संघांची शानदार सुरुवात
भारत आणि अमेरिका यांच्यात पहिल्यांदाच T20 सामना होणार आहे. हे दोन्ही संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. अमेरिकेने पाकिस्तान आणि कॅनडाचा पराभव केला तर भारताने आयर्लंड आणि पाकिस्तानला हरवले आहे. अ गटातील गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर आहे. तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.
IND vs USA खेळपट्टी व हवामान कसे असणार? :
T20 विश्वचषक 2024 चे आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिज करत आहेत. अमेरिका प्रथमच आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहे. अशा परिस्थितीत न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये ड्रॉप इन पिचचा वापर केला जात आहे. या मैदानावर एकामागून एक लो स्कोअरिंग सामने होत आहेत. सर्वात मोठ्या संघासाठी 100 धावा करणे देखील डोंगरावर उडी मारण्यासारखे आहे. अशा स्थितीत भारत विरुद्ध अमेरिका सामनाही लो स्कोअरिंग होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानं वाढवली मुंबईकरांची चिंता
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना आज होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल, तर स्थानिक वेळेनुसार हा सामना सकाळी 10 वाजता सुरू होईल. हवामान अहवालानुसार या काळात पावसाची शक्यता 6 टक्के आहे. मात्र ही टक्केवारी कमी असली तरी न्यूयॉर्कच्या हवामानावर विश्वास ठेवता येत नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पावसाची शक्यता पाच टक्के वर्तवण्यात आली होती. सामन्यादरम्यान अधूनमधून पाऊस पडत होता.
IND vs USA पाकिस्तान सुपर 8 मधील प्रवेश अमेरिकेच्या हातात
भारत विरुद्ध युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सामना जो संघ जिंकेल तो सुपर 8 साठी पात्र होईल. अशा स्थितीत पाकिस्तान अमेरिकेच्या पराभवासाठी प्रार्थना करत आहे. वास्तविक, आता सुपर-8 साठी पात्र होण्यासाठी पाकिस्तानला उर्वरित एक सामना जिंकावा लागेल. तसेच अमेरिकेला आपले दोन सामने गमवावे लागतील, तरच पाकिस्तान सुपर-8 साठी पात्र ठरू शकेल. सध्या पाकिस्तानने तीनपैकी एक सामना जिंकला आहे.
IND vs USA l T20 विश्वचषकासाठी दोन्ही संघ :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र यादव चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव : शुभमन गिल, खलील अहमद, आवेश खान, रिंकू सिंग.
अमेरिका : मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स (उपकर्णधार), आंद्रेस गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नॉस्तुश केंजिगे, सौरभ नेत्रावलकर, शेडली व्हॅन शेल्क्विक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर.
राखीव : गजानंद सिंग, जुआनो ड्रेसाडेल, यासिर मोहम्मद.