23.1 C
New York

Rainy Season: पावसाळ्यात योग्य छत्री कशी निवडाल ? लक्षात ठेवा फक्त या ३ गोष्टी

Published:

Rainy Season: पावसाळा अगदी तोंडावर आलाय.. म्हणजे आलाच असं समजा. पावसाळा सुरु झाला की (Rainy Season), आपल्याला सर्वात पाहिलं आठवते ती म्हणजे छत्री (Umbrella). दरवर्षीच जून महिन्यापासून पावसाची रिमझिम रिमझिम सुरु होते. पावसाळा जसा सुरु झाला की, आपण आपल्या घरातल्या छत्र्यांचा शोध लावायला सुरु करतो. कुठे कानाकोपऱ्यात छत्री सापडली तर ठीक, नाही तर परत एक नवी छत्री विकत घ्यायची तयारी आपल्याला ठेवावी लागते. सध्या पावसाचा हंगाम सुरु झाला आहे. छत्र्या लहान आकारांपासून ते मोठ्या आकारापर्यंत अगदी वेगवेगळ्या डीझाईनच्या बाजारामध्ये उपलब्ध असतात. अनेकप्रकारच्या छत्र्यांची व्हरायटी बाजारात पाहायला मिळते. त्यामुळे लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत कोणीही छत्री सहजपणे वापरू शकत. पावसाळ्यात छत्र्यांची गरज सर्वानाच भासते. आता हीच छत्री खरेदी करताना नेमकी कशी खरेदी करावी हाच प्रश्न तुम्हालाही पडतो ना मग काळजी करू नका, फक्त या ३ टिप्स नक्की लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पावसाळ्यात योग्य अशी छत्री नक्की कशी निवडावी.? चला तर पाहुयात..

Rainy Season: सध्या मार्केट मध्ये विविध रंगाच्या, रेम्बो छत्री,(Rainbow Umbrela) मल्टीकलर,(Multicolour) आर्मी सिल्व्हर, फॅमिली पॅक, कार्टूनच्या, प्रिंटेड, फोल्डिंग, गार्डन छत्री, ट्रान्सपरेंट, पॉकेट छत्री, हॅट अम्ब्रेला, लहान मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर व फ्लोरोसेंट रंगाच्या आणि आकारांच्या छत्र्या मिळतात. यामधूनच योग्य छत्री ओळखण्यासाठी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

छत्रीचा आकार महत्त्वाचा निवडा
कोणतीही छत्री खरेदी करत असाल तर सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रीचा आकार महत्वाचा आहे. जेव्हा पण छत्रीचा विचार केला जाती तेव्हा आकार महत्वपूर्ण भूमिका बजावतो. त्यामुळे पावसापासून संरक्षण करण्यासाठी पुरेल अशी रुंद छत असणारी छत्री निवडा. एक मोठी छत्री तुम्हाला वाऱ्यापासून आणि मसळधार पावसापासून चांगले संरक्षण देऊ शकते. आणि अशा छत्रीत तुम्ही मुसळधार पावसातही कोरडे राहू शकता.

पालीची भीती वाटते ? घरात पाल नको यायला म्हणून काय करावे

छत्रीचा टिकाऊपणा
आता अनेकदा पावसाळ्यात छत्री उडून जाण्याचे चान्सेस असतात. आणि आपण आपल्याच डोळ्यासमोर असं दृश्य पाहिलेलं देखील असत. त्यामुळेच मुसळधार पाऊस आणि वाऱ्यासह छत्री टिकून राहण्यासाठी छत्रीचा टिकाऊपणा नीट तपासून घ्या. छत्री निवडताना सर्वोच्च प्राधान्य टिकाऊपणालाच दिलं पाहिजे. छत्रीचा टिकाऊपणा जास्तीत जास्त फायबरग्लास किंवा स्टील फ्रेम्ससारख्या मजबूत सामग्रीपासून बनवलेला असावा, त्यामुळे अशा मजबूत असणाऱ्या छत्र्या निवडा.

वॉटर फॅब्रिक अम्ब्रेला
आता सर्वात महत्वाचं म्हणजे वॉटरप्रूफ (Waterproof) छत्री. पावसाळ्यात आपण पाहतो काही छत्र्या असून नसल्या सारख्याच असतात, कारण काही दिवसांच्या वापरातच त्या गळायला सुरु होतात. त्यामुळे छत्री निवडताना छत्रीच फॅब्रिक नीट तपासून घेणं महत्वाचं आहे. स्वतःला कोरड ठेवण्यासाठी छत्रीचे फॅब्रिक कसं निवडाल ते अत्यंत महत्वाचं आहे. नायलॉन किंवा पॉलिस्टरसारख्या जलप्रतिरोधक सामग्रीपासून छत बनवलेल्या असणाऱ्या छत्र्या निवडा, याचं कापड जलद वाळणार असतं.

या गोष्टी तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील याची खात्री आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img