सेंट झेवियर्स कॉलेजचा St. Xavier’s College प्रसिद्ध वार्षिक इंटरकॉलेजिएट स्पर्धात्सव मल्हार १५, १६ आणि १७ ऑगस्ट २०२४ रोजी रंगणार आहे. मल्हार म्हणजे झेवियर्सच्या मुलांसाठी एक आनंदोत्सव, एक अविस्मरणीय कार्यक्रम. दरवर्षी संत झेवियर्स महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ह्या फेस्ट मल्हारमध्ये नानाविधी कार्यक्रमाची जणू पर्वणीच असते. मागील वर्षी संगीतकार एपी ढिल्लों यांचा कॉन्सर्ट प्रचंड गाजला होता, त्यांच्या खुमासदार गाण्यांनी कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली होती. भारताचे माजी राष्ट्रपती माननीय डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्यांनी देखील ह्या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. आतापर्यंत अनुपम खेर, नसरुददीन शाह, रोहित सराफ, प्राजक्ता कोळी अशा अनेक दिग्गज कलाकारांनी मल्हारची शोभा वाढवली होती.
सुप्रीम कोर्टाचे ‘नीट’बाबत अहवाल देण्याचे निर्देश
ह्या वर्षी मल्हारची थीम ‘विवा ला विदा अशी आहे. आयुष्य मनमोकळेपणाने जगा, असा ह्या थीमचा अर्थ. ‘विवा ला विदा’ हे विचार आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा कानमंत्र देतात. जीवनामध्ये सुख संतोष, आणि समृद्धीचे अनेक विविध रंग आहेत. अशा या रंगामध्ये आपले जीवन समृद्ध बनवून, आपण आपल्या स्वप्नांच्या यात्रेला पुढे नेण्याची आवश्यकता असते. आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांमधून मार्ग कसा काढायचा हे आपणास शिकायला हवे. आपल्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आणि आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम साधण्यासाठी, आपण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणावर प्रेम करत राहण्याची आवश्यकता आहे. ही थीम सुखद जीवनाच्या मार्गावर चालत राहण्याचा विचार देते सामर्थ्य आणि स्वातंत्र्यचा प्रतीक म्हणजेच मल्हार, शेवटी मल्हार म्हटले तर उत्साह दाडगा असणारच तरुणाई, नाच, संगीत, साहित्य याचं सुंदर मिश्रण म्हणजे मल्हार आहे.