0.5 C
New York

Dombivli MIDC : डोंबिवली स्फोटाने पुन्हा हादरली

Published:

डोंबिवलीएमआयडीसीमध्ये (Dombivli MIDC) गेल्याच महिन्यात अंबर केमिकल कंपनीत रिएक्टर स्फोटाची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आता बुधवारी पुन्हा येथील इंडो अमाईन आणि अन्य एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. येथील अभिनव शाळेजवळ ही घटना घडल्याने त्या शाळेचे विद्यार्थी आणि येथील परीसरात असलेल्या नागरिकांत घबराट पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत स्फोट झाला आणि आगीची घटना घडली. यानंतर कंपनीतील कामगारांनी एकच पळ काढला असून वातावरण तंग झाले आहे.

एमआयडीसीतील कारखान्याचा आग लागल्याची माहिती मिळतेय. गेल्या काही दिवसांपूर्वी एमआयडीसीमध्ये आग लागली होती. यानंतर आता पुन्हा एकदा एका कारखान्याला आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अभिनव शाळेजवळ ही आग लागल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीमधील इंडो अमीन्स कंपनीला आग लागली आहे. ही आग भीषण असून आगीचे लोट दूरवर दिसून येतायत. आग लागलेल्या ठिकाणी स्फोटाचे आवाज येत असून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी भारताचे नवे लष्कर प्रमुख

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मधील एका कंपनीत हा स्फोट झाला आहे. कंपनीमध्ये अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पाच ते सहा अग्निशनम दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप काही स्फोटांचे आवाज येत आहे. आग आटोक्यात आलेली नाही. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. डोंबिवली एमआयडीसीमध्ये काही दिवसांपूर्वी एका कंपनीमध्ये स्फोट झाल्यानंतर सरकारने धोकादायक कंपन्या स्थलांतर करण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय सरकारने धोकादायक कंपन्या बंद केल्या आहेत अशी माहिती दिली होती. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या आजूबाजूची घरे रिकामे केले जात आहेत. किती लोक नेमके आत अडकले आहेत, याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img