मुंबई
डोंबिवली पूर्व येथील एमआयडीसीमध्ये (MIDC) असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत 23 मे रोजी आग लागली होती. या घटनेला महिनाही पूर्ण होत नाही तोच आता पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीसीतील (Dombivili Fire) एका कंपनीत पुन्हा एकदा मोठी आग लागली आहे. स्फोटांचे आवाज येत असल्याने डोंबिवली (Dombivli) हादरली आहे. यामुळे रहिवाशांमधे घबराट निर्माण झाली आहे. डोंबिवलीत पुन्हा (Dombivili MIDC Fire) आग लागल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) निशाणा साधला आहे. डोंबिवलीतील कंपन्यांमधून शिंदे गटाचे लोक किती हप्ते वसूल करतात हे आधी बघा. या ज्या घटना होतायत त्यांच्याकडे लक्ष द्या, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, संपूर्ण एमआयडीसीमधून शिंदे सेनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे द्यावे लागतील. एमआयडीसीमध्ये बेकादेशीर कामे सुरू आहेत. पोलिसांपासून शिंदेंच्या लोकांपर्यंत लाखो करोडोंचे हफ्ते कसे जातात हे तुम्ही एकदा तपासून घ्या. असे संजय राऊत म्हणाले.
डोंबिवली पूर्व येथील एमआयडीसीमध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत 23 मे रोजी आग लागली होती. या घटनेला महिनाही पूर्ण होत नाही तोच आता पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील इंडो अमाईन्स कंपनीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. एमआयडीसीतील ज्या कंपनीत आग लागली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील फेज 2 मध्ये असलेल्या इंडो अमाईन्स कंपनीला आज बुधवारी सकाळी 10.45 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याच्या काही वेळानंतरच धुराचे लोट हे डोंबिवली, कल्याणमधून दिसू लागले. पण काही वेळातच या कंपनीत सातत्याने स्फोट होऊ लागले. ज्यामुळे या कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आग लागताच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अभिनव शाळेजवळ ही घटना घडल्याने त्या शाळेचे विद्यार्थी आणि येथील परीसरात असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.