3.8 C
New York

Devendra Fadnavis : ‘संघर्ष समिती’च्या इशारानंतर फडणवीसांच्या घराबाहेरची सुरक्षित वाढ

Published:

नागपूर

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपूर येथील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटर योजना (Smart Prepaid Meters Plan) आणण्याचे राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. स्मार्ट प्रीपेड मोटर (Smart Meter) योजनेला विरोध होत आहे. या विरोधात नागरिक संघर्ष समिती यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नागरिक संघर्ष समितीनी दिलेल्या आंदोलनाच्या इशारा नंतर फडणवीस यांच्या घराची सुरक्षा वाढ करण्यात आली आहे.

महावितरणच्या विजेच्या प्रीपेड मीटर विरोधात विविध संघटनांची नागरिक संघर्ष समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून प्रीपेड मीटर विरोधात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या धरमपेठ येथील घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता हे आंदोलन व्हेरायटी चौकात करणार आहे. यामध्ये जय विदर्भ पार्टीसह विविध संघटनांचा संघर्ष समितीत सहभाग आहे.

आपण वापरत असलेल्या विजेच्या मीटरचा अत्याधुनिक प्रकार म्हणजे स्मार्ट मीटर आहे. रोज आपण किती वीज वापरली त्याचे रिडींग दर महिन्याला वीज कंपनी करते व त्यानुसार ग्राहकाला विजेची बील पाठवले जाते. पण स्मार्ट मीटरमध्ये आपण किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला आपल्या मोबाइलमध्ये कुठूनही, केव्हाही पाहता येणार आहेत. तसेच वीजवापरासाठीचे पैसेही कुठूनही, कधीही भरता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकाला आपला वीजवापर कमी-जास्त करता येईल किंवा विजेच्या वापराबाबत काही त्रुटी आढळल्यास त्याबाबत तत्काळ तक्रार करता येणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img