चंद्राबाबू नायडू हे आज सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी विजयवाडातील गन्नावरमजवळील केसरपल्लीमध्ये जय्यत तयारी झाली आहे. (Chandrababu Naidu ) चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तसंच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री, भाजपचे सरकार असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
Chandrababu Naidu चौथ्यांदा शपथविधी
‘प्रदेश विधानसभेतील ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’च्या (एनडीए) नेतेपदी एन. चंद्राबाबू नायडू यांची मंगळवारी निवड करण्यात आली. विजयवाडा येथे झालेल्या ‘एनडीए’च्या बैठकीत तेलुगू देशम, जनसेना आणि भाजपच्या आमदारांनी नायडू यांची एकमताने निवड केली दरम्यान, जनसेनाचे प्रमुख पवनकल्याण यांनी नायडू यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष डी.पुरंदेश्वरी यांनी अनुमोदन दिलं. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची ही त्यांची आता चौथी वेळ आहे.
मोदी सरकारकडून विकास निधीचा हफ्ता मंजूर
Chandrababu Naidu कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कक्ष
शपथविधी सोहळ्यासाठी 80 फूट रुंद, 60 फूट लांब आणि आठ फूट उंचीचे व्यासपीठ तयार करण्यात आलं आहे. एक भला मोठा तंबू उभारण्यात आला असून सोहळ्याला उपस्थित राहणारे पाहुणे आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी विशेष वाहनतळ सुविधा निर्माण केली आहे. चंद्राबाबू नायडू, जनसेनाचे प्रमुख पवन कल्याण आणि नंदमुरी बालकृष्ण यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी विशेष बैठक व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे आमदार आणि खासदारांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
Chandrababu Naidu पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित
‘एनडीए’च्या बैठकीत बोलताना नायडू यांनी अमरावती हीच आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी असेल, असं स्पष्ट केलं. ते म्हणाले, आमच्या सरकारमध्ये तीन राजधान्यांवरून कोणताही वेगळा विचार होणार नाही. आमची राजधानी अमरावतीच असेल. तसंच, आघाडीतील पक्षांना उद्देशून ते म्हणाले की, तुमच्या सहकार्यामुळे मी उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही शपथविधी सोहळ्यासाठी येत आहेत.