14.6 C
New York

Terrorist Attack : काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, लष्करी तळावर गोळीबार

Published:

जम्मू-काश्मीरमधील रियासी आणि कठुआनंतर आता डोडामध्येही दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. तीन दिवसांतील हा तिसरा हल्ला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या कार्यरत तळावर गोळीबार केला.दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. (Terrorist Attack ) या चकमकीत भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्तुरात 1 दहशतवादी ठार झाला. (Jammu Kashmir ) तर, दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. यासंदर्भातील माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिसांकडून रात्री उशीरा देण्यात आली.कठुआ जिल्ह्यातील एका घरावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. त्यानंतर काही तासांनंतर डोडामध्ये दहशतवादी हल्ला झाला.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काश्मीर टायगर नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. मंगळवारी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास छत्रकला येथे लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यापूर्वी जम्मूचे एडीजीपी आनंद जैन यांनी गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला असून एक नागरिक जखमी झाल्याचे सांगितले होते.

डोंबिवली स्फोटाने पुन्हा हादरली …

Terrorist Attack कठुआमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्येही दहशतवादी हल्ला झाला. काही दहशतवाद्यांनी येथे हवेत गोळीबार करून जंगलाच्या दिशेने पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. याची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला. सुरक्षा दलाच्या या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला.

गेल्या तीन दिवसांमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्यामुळे आता जम्मू काश्मीरसह सीमांवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरोच आंतरराष्ट्रीय सीमा, महामार्ग आणि पंजाब आणि हिमाचलच्या सीमेवरील चौक्यांवरही विशेष नजर ठेवण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या परिचालन तळावर (टीओबी) दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये ३ जवान जखमी झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तर अद्यापही डोडामध्ये चकमक सुरू असून काही ठिकाणी दहशतवादी लपल्याचा संशय लष्कराला असून त्या पार्श्वभूमीवर शोधमोहिम सुरु आहे.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. कधी नागरिक, तर कधी लष्कराच्या बेसवरच हल्ला केला जातोय. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला होता. यानंतर बस चालकाला गोळी लागल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला होता, तर ३३ जण जखमी झाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img