8.9 C
New York

Annasaheb Patil : कै. अण्णासाहेब चुडामण पाटील यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

Published:

स्वर्गीय कै. खासदार अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील (Annasaheb Chudaman Patil) यांचा 34 वा स्मृतीदिन बुधवार दि. 12 जून 2024 रोजी अण्णासाहेब चुडामण पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात (A C Patil College Of Engineering) सकाळी ठिक 11.30 वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एन. पवार (V.N. Pawar) सर यांच्या हस्ते त्यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्याच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. तसेच महाविद्यालयातील विभाग प्रमुख व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील अण्णासाहेब (Annasaheb Patil) अभिवादनास उपस्थितीत होते.

धुळे जिल्ह्यातील एकेकाळी कॉग्रेस पक्षाचे भीष्माचार्य म्हणून स्वर्गीय अण्णासाहेबांनी ओळख निर्माण केली होती. ते 1952 मध्ये मुंबई राज्यात विधान परिषद सदस्य, 1962, 1967 आणि 1971 च्या लोकसभा निवडणुकीत सलग तीनवेळा विक्रमी मतांनी विजयी झालेले व सतत गोरगरीबाच्या प्रश्नासाठी झटणारे जिल्हयातील अनेक प्रकल्प आणि संस्थाचे शिल्पकार स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब होते. त्यांचे चिरंजीव रोहिदास चुडामण पाटील महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विविध खात्याची जबाबदारी सांभाळणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व लोकनेते आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img