21 C
New York

Salman Khan : गोळीबार प्रकरणात सलमान खानचा जबाब नोंदवला

Published:

मुंबई

बॉलिवुडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घरावर 14 एप्रिलला गोळीबार (Firing Case) झाला होता. हा गोळीबार बिश्नोई गँगने (Lawrence Bishnoi) केल्याचं समोर आलं होतं. या गोळीबार प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून (Mumbai Police) करण्यात येत असून अशातच या प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवरील गोळीबार प्रकरणी सलमान खान याचा जबाब नोंदवला आहे. 4 जूनला मुंबई पोलिसांनी हा जबाब नोंदवला, बिश्नोई गँगने सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता.

मुंबईतील वांद्रेमध्ये अभिनेता सलमान खानच्या घरावर आरोपींनी 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला होता. गोळीबाराच्या या घटनेने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य ओळखत तातडीने तपास सुरू केला. सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विष्णोई टोळीचे दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे. यासह पोलिसांनी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल विष्णोई यांना वाँटेड घोषित केलं आहे.  

पोलिसांनी 72 तासांमध्ये आरोपींच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या. सागर पाल आणि विकी गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी बिहारमध्ये सराव केला असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img