7.6 C
New York

Jayant Patil : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार?

Published:

नुकत्यात्या लागलेल्या लोकसभा निकालात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे राज्यात अजित पवारांपेक्षा शरद पवारांचं राजकीय वजय कायम जास्त आहे असं चित्र सर्वत्र दिसतय. (Jayant Patil ) अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आता भाकरी फिरणार असल्याचं दिसतय. (Sharad Pawar) सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील हे आहेत. मात्र, नुकतच त्यांनी अध्यक्षपदाबाबत मोठं विधान केलं आहे.

Jayant Patil प्रदेशाध्यक्षपदाचे महिने मोजू नका

मी आणखी चार महिने राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असणार आहे. त्यानंतर मी त्या पदावर नसेल असं थेट वक्तव्य जयंत पाटील यांनी केल्याने नव्या चर्चेला उधान आलं आहे. तसंच, जयंत पाटील असं का म्हणाले याबद्दलही तर्क-वितर्क लावले जात आहेत. काल पक्षाच्या वर्धापन दिनानिमीत्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटलांनी हे वक्तव्य केलं आहे. त्याचबरोबर माझे प्रदेशाध्यक्षपदाचे महिने मोजू नका, काही तक्रार असल्यास शरद पवारांना सांगा असं म्हणत त्यांनी अजित पवारांना चिमटाही काढला आहे.

सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य, रोख कुणाकडं?

Jayant Patil आम्हाला 80 टक्के जागा

राष्ट्रवादीची काय अवस्था झाली आपण पाहिली असेल. चिन्हा नाव हे सगळं गेलं. त्यानंतर आमचं काय होणार असा सर्वांना प्रश्न पडला होता. मात्र, जनता पवार साहेबांच्या पाठिमाग आहे. त्यामुळे शरद पवारांना अनेकजण सोडून गेले असले तरी तुतारी चिन्हावर 8 खासदार निवडून आणले आहेत, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत. या निवडणुकीत आम्हाला 80 टक्के जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे जो आम्ही प्रयोग महाराष्ट्रात केला तो यशस्वी झाला आहे असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

Jayant Patil डोक्यावर परिणाम झालाय

जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करतील, असं अमोल मिटकरी म्हणाले होते. त्यावर बोलताना त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशी टीका पाटील यांनी मिटकरी यांच्यावर केली आहे. तसंच, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘पिपाणी’ चिन्ह नसतं तर आमची साताऱ्याचीही एक जागा वाढली असती, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले. त्याचबरोबर ही लढाई सोपी नव्हती. गेल्या एक वर्षात बरीच उलथापालथ झाली. स्वार्थापोटी अनेकांनी आपल्या पक्षाची साथ सोडली. मात्र, पुरोगामी विचारांनी फुललेला आपला वटवृक्ष डगमगला नाही असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img