19.7 C
New York

Sharad Pawar : शरद पवारांचा मोदींना थेट इशारा

Published:

शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आज नगर शहरात 25 वा वर्धपन दिन साजरा होत आहे. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होतं. या कार्यक्रमाला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंकेंसह सर्व निर्वाचित खासदार उपस्थित होते. यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, आजचा दिवस वर्धापन दिन आहे. सुदैवाने हा आनंद साजरा करण्यासाठी आपले दहापैकी आठ खासदार निवडून दिले. 25 वर्षापूर्वी पक्ष स्थापन केला तेव्हा तीन महिन्याच्या आत जनतेनं सत्तेवर बसवलं. 17-18 वर्ष सतत जनतेनं सेवा करण्याची संधी. केवळ राज्यातच नाही तर केंद्रातही काम करण्याची संधी मिळाली, असं पवार म्हणाले.

Sharad Pawar मोदींना जनतेची साथ नाही

पवार म्हणाले, मोदींनी शपथ घेतली. पण, त्यांना जनतेची साथ नव्हती. बिहारच्या मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. निवडणुक प्रचारात मोदी भारत सरकार नाही, मोदी सरकार म्हणायचे. मोदी सरकार की गॅंरटीचा नारा दिला. मात्र आता मोदींची गॅरंटी राहिले नाही, असा टोलाही पवारांनी लगावला.

खडसे आणि मोहोळ यांची खाती ठरली

Sharad Pawar … तुम्हाला सोडणार नाही

पवार म्हणाले, आम्ही टिपणी करतो. मात्र टीका-टिपणी करतानाही मर्यादा बाळगळतो. मोदीजी मला भटकता आत्मा म्हटले होतं. मात्र त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. आता हा आत्मा तुम्हाला कधी सोडणार नाही, असा इशारा देत मोदींनी शिवसेनेचा उल्लेख नकली शिवसेना असा केला. पंतप्रधानपदावरील व्यक्तीला असली वक्तव्य शोभत नाही, असंही पवार म्हणाले.पुढं बोलतांना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये राम मंदिराचा वापर केला. त्याचे परिणाम मोदींना भोगावे लागत आहे. अयोध्येत मोदींनी दिलेल्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावं लागलं, असंही पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img