टी-20 वर्ल्ड कप 2024 चा 22 वा सामना पाकिस्तान आणि कॅनडा PAK vs CAN यांच्यात न्यूयॉर्कमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. पाकिस्तानसाठी हा करो या मरोचा सामना आहे. जर त्यांनी हा सामना हारला किंवा तो रद्द झाला तर पाकिस्तानी संघाचे स्पर्धेतून बाहेर जाई. या कारणास्तव, सामन्यादरम्यान पाऊस पडणार नाही आणि संपूर्ण सामना पाहता येईल हे खूप महत्वाचे आहे. पाकिस्तान संघाने अद्याप गुणतालिकेत आपले खाते उघडलेले नाही. दोन सामन्यांत सलग दोन पराभवानंतर तो चौथ्या स्थानावर आहेत. टीम इंडिया दोन सामन्यांत दोन विजयांसह पहिल्या स्थानावर आहे तर यूएसए संघ दुसऱ्या स्थानावर आहे. कॅनडाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. पाकिस्तानचा तिसरा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. हा सामना गमावताच पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे.
हरभजन सिंगचा संताप, अखेर पाकिस्तानी खेळाडूने मागितली माफी
PAK vs CAN पाकच्या स्वप्नावर अवकाळी पाऊस घालणार खोडा?
टी-20 वर्ल्ड कप 2024 चा 22 वा सामना पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात न्यूयॉर्कमध्ये खेळला जाणार आहे. कॅनडाविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीवर पाकिस्तानला सुपर-8 मध्ये जाण्यासाठी त्यांना जिंकावा लागेल. यासोबत पूर्ण सामना व्हावा आणि पावसाने व्यत्यय आणू नये अशी त्यांची इच्छा असले.जर आपण 11 जून रोजी न्यूयॉर्कमधील हवामानाबद्दल बोललो तर, आकाश ढगाळ राहू शकते. पावसाचा अंदाज नसला तरी ढगाळ वातावरण असू शकते.
अशा स्थितीत पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानचे खाते उघडेल आणि साखळी टप्प्यातील आयर्लंडविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तरी त्यांना केवळ तीन गुण मिळतील. त्यानंतर पाकिस्तान ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडेल. पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा, आयर्लंड आणि भारत हे संघ अ गटात आहेत. पाकिस्तानला एकही सामना जिंकता न आल्याने ते गुणतालिकेत तळाशी आहेत. त्यांचा नेट रनरेट -०.१५० असा आहे. त्यामुळे त्यांना अखेरच्या दोन सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. तरच ते सुपर ८ च्या शर्यतीत टिकून राहतील. खरे तर दोन्ही सामने जिंकल्यानंतर देखील बाबर आझमच्या संघाला इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल. पाकिस्तानचा नेट रनरेट हा -०.१५० वर घसरला आहे. जर पाकिस्तानला सुपर ८ मध्ये प्रवेश करायचा असेल, तर उर्वरीत दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.