ओतूर,येथील ज्येष्ठ नागरिक इसम नबाब अहमद शेख वय ७२ वर्ष रा.ओतूर,ता.जुन्नर,जि.पुणे यांचा (Crime News) अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून,गळा आवळून त्यांचा हत्या केल्याची घटना शुक्रवार दि.७ रोजी रात्री साडेनऊ ते शनिवारी दि.८ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. दरम्यान ओतूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी या हत्येच्या गुन्ह्याचा तपास अवघ्या ४८ तासात लावून,शेख यांचा खून दरोडा टाकून,चोरी करण्याच्या उद्देशाने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.
या घटनेतील एकूण सात आरोपींपैकी विलास बाबा वाघ, वय २० वर्षे, प्रकाश बाबा वाघ वय १९ वर्षे, भिमा गणेश हिलम वय २५ वर्षे, तिघेही रा.ओतूर ( कन्या शाळेजवळ ),ता.जुन्नर, जि.पुणे,यांना हत्येच्या गुन्ह्यात अटक केली असून,इतर चार विधीसंघर्षीत बालकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सदर आरोपींनी कट रचून,दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सदरचा गुन्हा केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
राज्यात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज
या खुनाच्या घटनेचा तपास पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एल.जी.थाटे यांना यांच्या पोलीस पथकाला योग्य त्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी जवळपासचे सर्व सीसीटीव्ही तपासून माहिती घेतली.सदर घटनास्थळाजवळ घटनेच्या अगोदर अनोळखी सात इसमांची पोलीसांना संशयित हालचाल आढळून आल्याने त्यांची ओळख पटवून तसेच यांच्यासह इतर चार विधीसंघर्षीत बालकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
Crime News या हत्येच्या गुन्ह्याचा तपास अवघ्या ४८ तासात
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे,पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजू मोमीन, अतुल डेरे, संदिप वारे, अक्षय नवले, अक्षय सुपे,ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश पठारे, देविदास खेडकर, ज्योतीराम पवार, बाळशिराम भवारी, नदीम तडवी, यांनी केली असून,पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एल.जी.थाटे हे करत आहेत.