मुंबई
मुंबई एटीएसने (Mumbai ATS) बनावट कागदपत्रांसह मुंबईत राहणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना (Bangladesh Citizens) अटक केली, एटीएसने आणखी 5 बांगलादेशींची (Bangladesh)ओळख पटवली असून त्यांचा शोध सुरू आहे. बनावट नागरिकत्वाच्या कागदपत्रांच्या आधारे मतदार ओळखपत्रेही मिळवली असल्याने आरोपींनी लोकसभा निवडणुकीतही (Lok Sabha Elections) मतदान केल्याचे एटीएसने (ATS) उघड केले आहे.
बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात आलेल्या 4 बांगलादेशींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दहशतवाद विरोधीपथक जुहू युनिटने चारही जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील पहिल्या दोन जणांनी लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतील जोगेश्वरी येथे मतदान केल्याची माहिती समोर आली आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने चारही बांग्लादेशींवर कलम 465, 468, 471, 34 भा.दं.वि. सह कलम 12 (1A) भारतीय पारपत्र अधिनियम 1967 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन भारतीय पारपत्र प्राप्त करणाऱ्या खालील नमुद मुळच्या बांगलादेशी इसमांना अटक करण्यात आली.
अटक केलेल्या बांगलादेशींनींकडून पोलिसांनी ते सुरत, गुजरात येथे राहण्यास आहे असे पुरावा प्राप्त केले आहेत. तपासात आरोपींव्यतिरिक्त अन्य 5 जणांनीही बनावट कागदपत्र बनवल्याचे समोर आले असून पोलिस तपास करत आहेत. या आरोपीमधील एक आरोपी या बनावट कागदरपत्रांच्या आधारे सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.