23.1 C
New York

Ashadhi Ekadashi : आषाढी यात्रेसाठी एसटी 5 हजार विशेष बसेस सोडणार

Published:

मुंबई

पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ॥१॥ आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) विठू नामाचा गजर करीत श्रीक्षेत्र पंढरपूरला (Srikshetra Pandharpur) पायी जाणाऱ्या भाविकांसाठी तसेच त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी (ST) महामंडळाने यंदा दरवर्षीप्रमाणे मोठी जय्यद तयारी केली आहे. एकीकडे पावसाची दमदार सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामाची तयारी करत आहेत. यंदा या यात्रेसाठी एसटी (ST) महामंडळातर्फे (MSRTC) सुमारे पाच हजार विशेष गाड्या (Special Buses) सोडण्यात येणार आहेत.

पंढरपूर यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, संभाजीनगर ( औरंगाबाद) , नागपूर, अमरावती या सहा विभागातून एसटी बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे- जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे. लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी वर्ग अहोरात्र कार्यरत राहणार आहेत.

सालाबाद प्रमाणे श्री श्रेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखीं बरोबर चालत दिंडीने येतात या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. 40 पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. दरम्यान, मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रे निमित्त 4245 विशेष बसेस सोडल्या होत्या. याव्दारे यात्रा काळामध्ये 18 लाख, 30 हजार, 934 भाविक प्रवाशांची सुखरूप ने-आन एसटीने केली होती.

पंढरपूरची आषाढी वारी हा महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातीलही भाविकांसाठी भक्तीचा मेळा असतो. या सोहळ्यासाठी दरवर्षी शेतकरी बांधव पायी चालत पंढरीला निघतात. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ दरवर्षी नियोजन करीत असते. राज्याचे मुख्यमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर यात्रेच्या जादा वाहतूकीचा आढावा घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) मधून 1200, मुंबई 500, नागपूर 100, पुणे 1200, नाशिक 1000 तर अमरावती येथून 700 अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img