23.1 C
New York

MLC Election : ‘मविआ’त पुन्हा बिघाडी; ठाकरेंच्या निर्णयाने काँग्रेसमध्ये संताप

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मध्ये जागा वाटपावरून वाद झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षी प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांना विचारात न घेता उमेदवारांची यादी जाहीर केले होते. उद्धव ठाकरे यांनी आता पुन्हा विधान परिषदेमध्ये (MLC Election) महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारात न घेता यादी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता आहे.

राज्यात नाशिक मुंबई शिक्षक मतदार संघाने आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक 26 जून रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वतीने नाशिक आणि मुंबई या चारही जागेवर उमेदवार जाहीर केले आहे. त्यामुळे हा विकास आघाडीतील मित्रपक्ष असलेला काँग्रेस नाराज झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी आघाडीतील इतर पक्षांना विचारात न घेता परस्पर यादी जाहीर केले असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी म्हटले आहे.

नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना नाशिकचे उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांना मी स्वतः संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही असे नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले म्हणाले, ते लंडनमध्ये गेले त्यावेळी देखील फोन केला. त्याचवेळी मी त्यांना म्हणाले दोन जागा तुम्ही लढा दोन जागा मी लढतो. त्यावेळी ते म्हणाले तुमचे उमेदवार कोण आहेत? मग मी उमेदवारांची नावे सांगितली. मूळ प्रश्न आहे की, चर्चा करुन जागावाटप केले असते तर या चारही जागा निवडून येणे सोपे झाले असते. मी सकाळपासून त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करत आहे.मात्र त्यांचे ऑपरेटर आमच्या ऑपरेटरला साहेब तयार होत आहेत असाच निरोप देत आहे. माझ्याशी काय उद्धव ठाकरेंचा संपर्क झाला नाही. त्यामुळे नेमके त्यांच्या मनात काय आहे हेच कळत नाही.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी सोमवारी 10 जून करण्यात आली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 12 जून अशी आहे. 26 जून रोजी चारही मतदारसंघाकरिता मतदान होणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया 5 जूलै रोजी पूर्ण होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img