ठाणे
ठाण्यासह कल्याण (Kalyan)आणि डोंबिवलीमध्ये (Dombivli) मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची (Maharashtra Weather Update) तारांबळ उडाली. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे याठिकाणावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह प्रवाशांचे हाल होत आहे.
ठाण्यामध्ये मुसधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे ठाण्याच्या वंदना सिनेमा परिसरासह बाजारपेठ, राम मारुती रोड, नौपाडा, घोडबंदर रोडच्या काही भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. या परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. आज सकाळपासून ठाण्यामध्ये ढगाळ वातावरण होते. अचानक दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या ठाणेकरांची तारांबळ उडाली. गेल्या तासाभरात झालेल्या १५ मिलिमीटर पावसाने ठाणे शहराच्या नालेसफाईची पॉलखोल केली आहे.
तर उल्हासनगरमध्ये देखील काही वेळापूर्वी पावसाला सुरुवात झाली. उल्हासनगरच्या अनेक परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अचानक आलेल्या पावसाने उल्हासनगरच्या नागरिकांची चांगली तारांबळ उडाली. सकाळपासूनच उल्हासनगर शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारपासून पावसाला सुरूवात झाली असून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे.