19.7 C
New York

Kamran Akmal :  हरभजन सिंगचा संताप, अखेर पाकिस्तानी खेळाडूने मागितली माफी

Published:

टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत पाकिस्तानवर 6 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सातवा विजय ठरला. विजयासाठी दिलेल्या 120 धावांचा पाठलाग करायला आलेल्या पाकिस्तानला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगलाच घाम फोडला. पाकिस्तानने आश्वासक सुरुवात केली. मात्र त्यांनतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक करत पाकिस्तानच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला. अर्शदीप सिंह याने टीम इंडियाकडून शेवटची अर्थात 20 वी ओव्हर टाकली. टीम इंडियाने पाकिस्तानला 113 धावांवर रोखलं. या स्पर्धेतील टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय ठरला.

पाकिस्तानचा माजी विकेटकीपर फलंदाज कामराम अकमल Kamran Akmal याने अर्शदीप सिंह याच्यावर केलेल्या टिप्पणीवरुन टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह संतापला आहे. हरभजनने कामरानचा वादग्रस्त वक्तव्याचा व्हीडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिट्वीट केला आहे. हरभजनने कामरानवर जाहीर संताप व्यक्त केला आहे. हरभजनन कामरानवर नक्की का संतापला? हे आपण जाणून घेऊयात. कामरान अकमलने टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यादरम्यान एका शोमध्ये कामरान अकमल एक्सपर्ट म्हणून सहभागी झाला होता. कामरानने या शोमध्ये अर्शदीप सिंगवर टिप्पणी केली. “अर्शदीप सिंह याला शेवटची ओव्हर टाकायची आहे. तसा तो रंगात दिसत नाही. तुम्हाला माहित आहे 12 वाजले आहेत” यानंतर कामरान हसतो. या मुद्दयावरुन हरभजनने संताप व्यक्त करत कामरानची लाज काढली आहे.

‘मिर्झापूर सीझन 3’ साठी व्हा तयार! रिलीज डेट आली समोर

Kamran Akmal हरभजन सिंह संतापला

“लाज आहे तुझी, घाणेरडे तोंड उघडण्यापूर्वी इतिहास जाणून घ्या. आम्ही शिखांनी तुमच्या आई-बहिणींचा अपहरणकर्त्यांकडून बचाव केला. वेळ 12 वाजताची होती. त्यामुळे तुम्हा लोकांना लाज वाटली पाहिजे. कामरान अकमल तुम्ही याबद्दल खरं तर आभार मानायला हवे.

Kamran Akmal कामरान अकमलने शीख समुदायाची माफी मागितली

हरभजन सिंगच्या या संतप्त उत्तरानंतर कामरान अकमलने शीख समुदायाची माफी मागितली आहे. अकमलने X वर लिहिले, “मला माझ्या अलीकडील टिप्पण्यांबद्दल मनापासून खेद वाटतो आणि हरभजन सिंग आणि शीख समुदायाची मनापासून माफी मागतो. माझे शब्द अयोग्य आणि अपमानास्पद होते. मला जगभरातील शीख लोकांबद्दल अत्यंत आदर आहे आणि कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. “मला खरच माफ करा.”

Kamran Akmal अखेरच्या षटकात अर्शदीपने सामना जिंकवला –

भारत आणि पाकिस्तान यांच्यात ९ जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेला सामना अतिशय रोमांचक होता, जो रोहित शर्मा आणि कंपनीने ६ धावांनी जिंकला. ज्यामध्ये पाकिस्तानला १८ धावांची गरज होती. पण, अर्शदीपने केवळ ११ धावा देत पाकिस्तानचा पराभव केला होता. भारतीय वेगवान गोलंदाजाने शेवटच्या षटकात काही अचूक यॉर्कर टाकले होते, ज्याचे पाकिस्तानी फलंदाजांकडे उत्तर नव्हते. शेवटच्या षटकात त्याने १ बळीही घेतला

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img