मुंबई
लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) महायुतीला (MahaYuti) मोठा फटका बसला आहे. निवडणुकीत महायुतीला शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे (Farmers Of Questions) फटका बसला. राज्यातील कांदा, सोयाबीन आणि कापसाने महायुतीला फटका दिला असल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सह्याद्री अतिथीगृहवर पार पडलेल्या केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या (Commission for Agricultural Costs and Prices) शेती पीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी बैठकीत बोलताना दिली आहे. त्यामुळे या पुस्तकाचे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी पराभवांचं कारण सांगितलं. राज्यामध्ये सत्तेत असताना सुद्धा महायुतीला लोकसभा निवडणुकीत हवे तसे यश मिळवता आले नाहीये. निवडणुकीत कोणत्या कारणांमुळे जागा कमी झाल्या याचं विचारमंथन महायुतीतील पक्ष करत आहेत. कोणत्या मुद्द्यांमुळे फटका बसला याची माहिती मतदारसंघानिहाय घेतली जात आहे.
महायुतीला लोकसभेत संविधान बदलाच्या मुद्द्यासह कापूस, सोयाबीन आणि कांद्यांचा फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. आज सह्याद्री बंगल्यावर झालेल्या शेती पीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची बैठक झाली. त्यात खुद्द मुख्यमंत्री शिंदेंनी त्याची कबुली दिली. सोयाबीन आणि कापसा करता साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद केली पण आंचार संहितेत अडकली. दरम्यान सोयाबीन, कापूस आणि कांद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले आहे काही ठोस निर्णय घेणे गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.
राज्यात सापडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला आहे. राज्यात माहितीला 48 पैकी केवळ 17 जागा मिळाली आहे. तर महाविकास आघाडी 30 जागा मिळाली आहे. निवडणुकीपूर्वी राज्यात महायुतीचे 45 जागा मिळवण्याचे लक्ष होते.