17.6 C
New York

Palghar Crime News : प्रियकराकडून प्रेयसीची हत्त्या, नेमकं कारण काय ?

Published:

प्रेयसीच्या घरातून प्रेमसंबंधाला विरोध असल्याचं कारण मनात ठेवून रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून Palghar Crime News तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर तालुक्यातील मुरबे येथे घडली आहे. हत्या झालेल्या तरुणीचे नाव स्नेहा पुरुषोत्तम चौधरी असे आहे. तर सुमित तांडेल असं प्रियकराचं नाव आहे. प्रेयसीची हत्या करून आरोपी प्रियकर फरार झाला होता. सोमवारी संध्याकाळी सातपाटी येथून त्याला पोलिसांनी अटक केली. लग्नाला कुटुंबियाचा विरोध होता. त्याच वादातून प्रियकराने हे पाऊल उचलले. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सुमीत नवनीत तांडेल याचे स्नेहा पुरुषोत्तम चौधरी (वय १९) या मुलीसोबत पालघरमधील मुरबे येथे राहणाऱ्या प्रेमसंबंध होते.प्रियकराने त्यांच्यात भांडण झाल्यामुळे प्रेयसीच्या डोक्यात दगड मारुन तिची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमीत हा एमआयडीसी परिसरात एका फॅक्टरीमध्ये काम करायचा. त्याच्याविरोधात कलम ३०२ आणि २०१ आयपीसीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है… पाटलांचा महायुतीला टोला

Palghar Crime News मृतदेह खाजन परिसरात सापडला

दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी मुलीचे कुटुंबीय आणि पोलिसांना दिल्यानंतर बोईसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह खाजन परीसरात शोधमोहीम सुरू केली. स्नेहा चौधरी हिचा मृतदेह दुपारी 2 वाजेच्या सुमारास खाजन परीसरात सापडला. लाल रंगाचे कपडे आणि काळ्या रंगाची बॅग यावरून तिची ओळख पटविण्यात आली. येथे त्याने तिची हत्या केली. मृतदेह तेथेच टाकून तो फरार झाला.

Palghar Crime News स्नेहाच्या कुटुंबीयांचा प्रेमसंबंधाला विरोध

मुरबे येथे स्नेहा चौधरी आणि सुमित तांडेल हे शेजारी शेजारी राहत होते. स्नेहा हिच्या मोठ्या बहिणीचा तीन दिवसांपूर्वीच साखरपुडा पार पडला होता तर स्नेहा आणि सुमित यांच्या प्रेमसंबंधास स्नेहाच्या कुटुंबीयांचा मोठा विरोध होता. त्यामुळे त्यांच्या लग्नाला परवानगी मिळत नव्हती. त्यावरुनच त्यांचे भांडण झाले असावे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. स्नेहा आणि तिच्या प्रियकरामधील भांडण वाढले. त्यातच त्यांने स्नेहाच्या डोक्याला मारले. एका व्यक्तीने तिथून बाजूने जाणाऱ्या हे सर्व पाहिले. त्याने या घटनेची माहिती बोईसर पोलिस ठाण्याला दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img