8 C
New York

Amit Thackeray : नीट परीक्षेवरून अमित ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Published:

मुंबई

देशभरात नीटपरीक्षेच्या (NEET) निकालावरून वाद होत असल्याचं दिसत आहे. परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याने परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. अशातच मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनीही यावरून टीका केली आहे.

अमित ठाकरे यांची फेसबुक पोस्ट

नीट’ची परीक्षा तरी नीट घ्या !

हरियाणातील काही विद्यार्थ्यांना ‘नीट’ या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात? ६७ मुलांना पैकीच्या पैकी गुण? हे काय चालले आहे? ‘नीट’ ही परीक्षा आता खाजगी क्लासेस आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या दलालांच्या ताब्यात गेली आहे का?

परीक्षेत गडबड, विद्यार्थी-पालकांमध्ये अविश्वास, डॉक्टर बनण्याची इच्छा बाळगणारे विद्यार्थी आणि पालक यांच्यात तीव्र संताप, आंदोलने… हे चित्र निश्चितच दुर्दैवी आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आंदोलने सुरू आहेत, हे बरे नव्हे!

पेपरफुटीसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास अजूनही यंत्रणा अपयशी का? पारदर्शकतेचा अभाव दिसून येतोय. ‘नीट’ परीक्षा केवळ डॉक्टर बनण्याचा मार्ग नाही तर अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि भविष्याचा आधार आहे. या परीक्षेतील गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे मनोबल खचले आहे आणि त्यांच्या आकांक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

केंद्र सरकारने तात्काळ या गंभीर परिस्थितीचा तोडगा काढून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पालक आणि विद्यार्थ्यांना घेवून रस्त्यावर उतरेल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि शिक्षणाच्या गरिमेशी खेळ करणं, हे कदापिही सहन केलं जाणार नाही!

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img